Mumbai: नपुंसकाकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या व्यक्तीची 6 जणांकडून हत्या; आरोपींना अटक
Murder | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

मुंबई (Mumbai) मध्ये गुरुवारी एका व्यक्तीची सहा इसमांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत व्यक्ती एका नपुंसक व्यक्तीकडे वारंवार शरीरसुखाची मागणी करत होता. टाईम्स इंडियाच्या रिपोर्टनुसार, मृत व्यक्तीचे नाव सुहेल अहमद शाह असे असून तो 36 वर्षांचा होता. हत्या केलेल्या सहा इसमांपैकी 4 जण हे एका परिवारातील आहेत. शाह हे बंगनवाडी (Baiganwadi) भागात जखमी अवस्थेत आढळून आले. त्यानंतर स्थानिकांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

शाह हे मद्यधुंद अवस्थेत होते आणि त्यांनी काईनाथ नामक नपुसंक इसमाला बोलावून त्याच्याकडून शरीरसुखाची मागणी केली. शाह आपल्या मित्रांसोबत दारु पित असताना त्यांनी शहेनाज अन्वर हुसेन शेख नामक स्त्री ला बोलावले होते. शहेनाजने आपल्या सोबत काईनाथला देखील आणले होते. काईनाथचा मोबाईल नंबर घेतल्यानंतर त्यांनी त्या दोघांना जाण्यास सांगितले. काही वेळान शाह यांनी काईनाथच्या मोबाईलवर फोन करुन शरीरसुखाची मागणी केली.

काईनाथने याबद्दल शहेनाजला सांगितल्यावर शहेनाज, पती यासिन मोहिम खान, मुलगी आफरिन सुलेमान शेख, मुलगा आवेश आणि अन्य दोन व्यक्ती घटनास्थळी पोहचल्या. तिथे शाहसोबत झालेल्या वादावादीनंतर चाकू भोकसून त्यांची हत्या करण्यात आली. (Ulhasnagar: खळबळजनक! उल्हासनगर येथे अवघ्या 20 रुपयांसाठी एका तरुणाची हत्या)

दरम्यान, पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. घटनेच्या काही तासांतच 6 जणांना अटक करण्यात आली होती. परंतु, घटनेतील मुख्य आरोपी यासिन मोहिम खान अद्याप बेपत्ता आहे. त्यांच्या विरोधात आयपीसी सेक्शन 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.