Mumbai: फार्मास्युटिकल कंपनीत काम करणाऱ्या एका व्यक्तीला ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये व्यक्तीने 2.5 लाख रुपये गमावले असून फोनवरील व्यक्तीने त्याला मोबाईल सेवा देणाऱ्या कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. तेव्हाच त्याने पीडित व्यक्तीला पैसे ही पाठवण्यास सांगितले.(ANC Seizes Cocaine: मुंबईत अंमली पदार्थ विरोधी सेलकडून 33 लाख रुपयांचे कोकेन जप्त, एका नायजेरियनला अटक)
सदर व्यक्तीने त्याची फसवणूक झाल्याने वांद्रे पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. 58 वर्षीय फसवणूक झालेल्या व्यक्तीने असे म्हटले की, त्याला एक टेक्स मेसेज येत त्यामध्ये केवायसी अपडेट करण्यासंबंधित तातडीने फोन करावा असे म्हटले. मेसेज मध्ये एक क्रमांक सुद्धा दिला गेला होता. कोणताही विचार न करता व्यक्तीने दिलेल्या क्रमांकावर फोन लावला.
फोन करताच एका व्यक्तीने तो उचलत आपण एका मोबाईल कंपनीचे सर्विस प्रोव्हाइडर असल्याचे म्हटले. त्याने व्यक्तीला त्याच्या डेबिट कार्ड आणि बँक खात्याची केवायसीसाठी माहिती मागितली. व्यक्तीने ती सहज फोनवरील व्यक्तीला दिली.(Mumbai Theft: मुंबईमध्ये घरोघरी जाऊन भिक्षा मागण्याच्या बहाण्याने करायचे चोरी, पोलिसांनी सापळा रचत घेतलं ताब्यात)
अवघ्या काही सेकंदात त्याच्या खात्यातून 2.5 लाख रुपये काढल्याचे दिसून आले. अशाप्रकारे नऊ ट्रांजेक्शन झाल्याचे तक्रारकर्त्याने म्हटले. त्यामुळे तातडीने व्यक्तीने पोलिसात धाव घेतली. तर याआधी 21 डिसेंबरला ऑनलाईन पद्धतीने फर्निचर विक्री करण्याच्या प्रकरणात 40 हजार रुपये गमावल्याचे समोर आले होते.