मुंबई: फेसबूक, इंन्टाग्रामवर एका महिलेचे अश्लील फोटो शेअर करणाऱ्या तरुणाला अटक
Arrest | Representational Image | Photo Credits: File Photo

फेसबुक (Facebook) आणि इंस्टाग्रामवर (Instagram)  बनावट प्रोफाइल तयार करुन संबंधित महिलेचे अश्लील फोटो (Obscene Pictures) शेअर केल्याप्रकरणी मुंबई (Mumbai) पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. आरोपी आणि पीडित महिला यांच्यात प्रेमसंबंध असून दोघेही लग्न करणार होते. परंतु आरोपीच्या स्वभावाला वैतागून पीडिताने त्याच्याशी नाते तोडले. यावर संताप व्यक्त करत आरोपीने पीडिताचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. पीडिताच्या मित्राने 28 डिसेंबर रोजी तिचे फोटो फेसबुक आणि इंस्टाग्रामवर व्हायरल होत असल्याची माहिती दिली. त्यानंतर पीडिताने मालवण पोलीस स्थानकात जाऊन आरोपीच्या विरोधात तक्रार नोंदवली.

सायबर क्राईमसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रियेसीने आपल्याशी प्रेमसंबंध तोडल्यामुळे आरोपीने फेसबूक आणि इंस्टाग्रामवर पीडिताच्या नावाने बनावट खाते उघडले. एवढेच नव्हेतर या आरोपीने संबंधित पीडिताचे अश्लील फोटो या खात्यावर शेअर करत शहरातील अव्वल क्रमांकाची वेश्या असा मजकूरही टाकला. दरम्यान, पीडिताच्या एक मित्राने 28 डिसेंबर रोजी तिचे फोटो फेसबुक आणि इंस्टाग्रामवर व्हायरल होत असल्याची माहिती दिली. पीडिताच्या मित्राकडून फोटोंचे स्क्रीनशॉट मिळाल्यानंतर महिलेला समजले की, आरोपीने आपले अश्लील फोटो काढले होते. त्यानंतर पीडीताने आरोपीकडे या संदर्भात विचारणा केली. त्यावेळी आरोपीने कबूल केले की त्यानेच बनावट प्रोफाइल तयार केली आहे. तसेच त्यावेळी आरोपीने पिडिताला, तिच्या बहिणीला आणि पालकांना जिवित मारण्याची धमकीही दिली, अशी तक्रार मालेगाव पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. हे देखील वाचा- कोल्हापूर: तरुणीवर सामूहिक बलात्कार; डोळ्यात स्प्रे मारून पीडितेचे अपहरण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेत केअर टेकर म्हणून काम करणारी 30 वर्षीय महिला 2017 पासून त्या पुरुषाशी संबंधात होती. तसेच दोघांचे 2018 मध्ये लग्न होणार होते. परंतु. महिलेने संबंधित पुरुषाच्या गैरवर्तनाला वैतागून लग्नास नकार दिला होता. तरीदेखील आरोपी महिलेला त्याच्याशी लग्न करण्यासाठी जबरदस्ती करत होता. या नैराश्यातून आरोपीने महिलेचे अश्लील फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याची माहिती समोर आली आहे.