Mumbai: कांदिवली येथील एका मेकअप आर्टिस्टला ऑनलाईन दारु खरेदी करणे चांगलेच महागात पडले आहे. यामध्ये तिने 70 हजार रुपये गमावले आहे. महिलेला तिच्या बहिणीला वाढदिवसानिमित्त वाइनची बॉटल गिफ्ट म्हणून द्यायची होती. परंतु तिच्यासोबत फसवणूक झाली असून तिच्या खात्यातील हजारो रुपयांची रक्कम चोरीला गेली आहे.(Navi Mumbai Extortion: बलात्कारातील आरोपीच्या पत्नीकडे तक्रार मागे घेण्यासाठी खंडणी मागितल्याच्या आरोपात 5 जण अटकेत, नवी मुंबई पोलिसांची कारवाई)
सदर महिलेने ऑनलाईन पद्धतीने एका दारुच्या दुकानाचा क्रमांक सर्च करुन तो मिळवला. त्यानंतर दिलेल्या क्रमांकाच्या यादीतील एक नंबरवर तिने फोन लावला. फोनवरील व्यक्तीने तो दारुच्या दुकानातील कर्मचारी असल्याची बनावट ओळख करुन दिली. त्यानंतर आरोपीने महिलेला 1500 रुपये भरा असे सांगितले.
पुढे आरोपीने महिलेला 17,051 रुपये ही प्रोसेसिंग फी भरावी लागेल असे ही म्हटले. पण आरोपीने तिला काही तांत्रिक अडचणीमुळे ते पैसे आले नसल्याचे सांगितले. त्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा ती रक्कम पाठवावी असे महिलेला म्हटल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती दिली.(Pune Crime: पुण्यामधील एका खाजगी कंपनीत संशोधन अहवालांची विक्री केल्याप्रकरणी माजी कर्मचाऱ्याला अटक)
जेव्हा महिलेने रिफंड मागितले असता आरोपीने तिला एक लिंक पाठवी. तेथे तिला बँक खात्यासंबंधिक अधिक माहिती त्या लिंकवर भरण्यास सांगितले. महिलेने कोणताही विचार न करता त्यावर सर्व माहिती दिली असता तिच्या खात्यातून 34,102 रुपये काढले गेले. अशा प्रकारे महिलेच्या खात्यातून 69,704 रुपये चोरी गेल्याचे कळले. तिने पोलिसात धाव घेत एफआयआर दाखल केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.