मुंबई शहारामध्ये मोठं हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीला भेट देण्यासाठी आज केंद्रीय पथक मुंबईत दाखल झालं आहे. आज त्यांनी धारावीमध्ये जाऊन प्रत्यक्ष क्वारंटीन सेंटरला भेट दिली आहे. यावेळेस उपाययोजनांची माहिती देखील देण्यात आली. दरम्यान केंद्रीय पथकासोबत महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील उपथित होते. त्यांनी राजीव गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये उभारण्यात आलेल्या क्वारंटीन सेंटरला भेट दिली. सध्या धारावीमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 180 वर पोहचला आहे. 1 एप्रिलला पहिला कोरोनाबाधित रूग्ण आढळला त्यानंतर सातत्याने धारावीत रूग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने आता केंद्रानेही या भागात चोख व्यवस्था ठेवण्यासाठी परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
महाराष्ट्रात दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या आकड्यांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मागील 24 तासात राज्यात 553 नवे कोरोनाबाधित वाढल्याची माहिती समोर आली आहे. तर दिवसभरात 19 कोरोनाबाधितांचा बळी गेल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकदा 5229 वर पोहचला आहे. तर एकूण कोरोना बळींचा आकडा 251 पर्यंत पोहचला आहे. दरम्यान राज्यातील सर्वाधिक कोरोनाबाधित मुंबई शहरामध्ये आहेत.
ANI Tweet
Mumbai: Maharashtra Health Minister Rajesh Tope and the Inter-Ministerial Central Team (IMCT) visit quarantine facility at Dharavi transit camp.
A total of 180 #COVID19 positive cases have been reported till now in Dharavi area of Mumbai, with several people under quarantine. pic.twitter.com/G7wxg1hz1u
— ANI (@ANI) April 22, 2020
धारावी ही आशियामधील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. यामध्ये सुमारे 10 लाख लोकांची वस्ती आहे. एकाच 10 बाय 10 च्या खोलीत सुमारे 5-6 लोकं एकत्र राहतात. अशावेळेस अदृश्यपणे नागरिकांवर हल्ला करणारा कोरोना व्हायरस झपाट्याने फैलावत असल्याचं मागील काही दिवसांपासून समोर आलं आहे. परिणामी मुंबईमध्ये कोरोना बाधितांच्या आकड्यामध्ये मोठी वाढ पहायला मिळत आहे. मुंबईने 3000 कोरोनाबाधितांचा आकडा पार केला आहे.