Mumbai Local (Photo Credit - PTI)

मुंबई (Mumbai) मध्ये कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अजूनही लोकल प्रवास सर्व नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला नाही. मात्र हळूहळू पूर्वपदावर येत असलेल्या मुंबई लोकलमध्ये (Mumbai Local) आता चौथी लाईन म्हणजेच नेरूळ/बेलापूर - खारकोपर मार्गावर (Nerul/Belapur-Kharkopar Section) 20 नोव्हेंबरपासून 8 नव्या फेर्‍या सुरू होणार आहेत. मध्य रेल्वेकडून चालवल्या जाणार्‍या या 8 विशेष मुंबई लोकलचं वेळापत्रक रेल्वे प्रवाशांसाठी जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये नेरूळ- खारकोपर अप आणि डाऊन प्रत्येकी 2 तर बेलापूर- खारकोपर अप आणि डाऊन प्रत्येकी 2 लोकल धावणार आहेत. Mumbai Local Train Timetable: मध्य रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांमध्ये करण्यात आले 'हे' महत्त्वाचे बदल, वाचा सविस्तर

मध्य रेल्वेकडून सध्या मेन लाईन, हार्बर, ट्रान्स हार्बर पाठोपाठ आता चौथ्या कॉरोडोरवर देखील लोकल फेर्‍या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबईत एकूण 1580 लोकल फेर्‍या मध्य रेल्वेकडून चालवल्या जात आहेत.

मध्य रेल्वे ट्वीट

नेरूळ-खारकोपर पहिली ट्रेन सकाळी 8.45 ची असेल. तर त्यापाठोपाठ बेलापूर- खारकोपर पहिली ट्रेन 9.32 ला असेल. खारकोपर - नेरूळ शेवटची ट्रेन संध्याकाळी 6.15 ची आहे. तर खारकोपर-बेलापूर ही ट्रेन शेवटची संध्याकाळी 7 वाजाताची असेल.

दरम्यान रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय रेल्वे मंत्रालय, राज्य सरकार यांनी ज्या वेळेत आणि जितक्या कर्मचार्‍यांना मुंबई लोकलचा प्रवास करण्याची मुभा दिली आहे तितक्याच लोकांना मध्य रेल्वेच्या चौथ्या कॉरिडोर मार्गावरील ट्रेनमधून प्रवास करता येणार आहे.