मुंबई लोकल ही मुंबई शहराची लाईफ लाईन आहे. आज सकाळी सायन- माटूंगा रेल्वे मार्गावर रेल्वे मार्गाला तडा गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान आज सकाळी ऐन गर्दीच्या वेळेस हा गोंधळ झाल्याने सामान्य प्रवाशांचे हाल झाले आहेत. दरम्यान रेल्वे प्रशासनाकडून तातडीने दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
आज सकाळी 7.20 च्या सुमारास सायन आणि माटुंगा दरम्यान रेल्वे रूळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान अप धीम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने रेल्वे स्टेशन प्रमाणेच ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. मंकी हिल ते कर्जत दरम्यान 15-20 जानेवारी पर्यंत रेल्वे कामांसाठी ब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक.
मध्य रेल्वे मार्गावर रेल्वेचं वेळापत्रक बिघडल्याने सध्या लोकल 10-15 मिनिटं उशिराने धावत आहे. ठाणे दिशेकडे जाणारी लोकल कोलमडल्याने कुर्ला, घाटकोपर, यासारख्या स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. थंडीच्या दिवसांत घर्षणामुळे रेल्वे रूळाला तडे पडतात. आजही मध्य रेल्वे मार्गावर अशाच प्रकारे तडे गेल्याचं लक्षात आल्यानंतर रेल्वे कर्मचार्यांकडून तात्काळ दुरूस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून मुंबई शहरात थंडीचा पारा खालावत आहे. आज यंदाच्या मोसमातील थंड दिवस आहे.