मुंबई डिव्हिजनच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील (Western Railway) मध्ये लोकल ट्रेन मध्ये आता महिला प्रवाशांची संख्या वाढवण्यात आली आहे. एकूण आसन व्यवस्थेच्या 23.33% वरून आता ती 25.47% करण्यात आली आहे. त्यामुळे महिला प्रवाशांसाठी ही एक दिलासादायक बाब आहे. गर्दीच्या वेळेस लोकल मध्ये बसण्याच्या जागेवरून वाद झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत.हे देखील नक्की पहा: Mumbai: ठाण्याहून पनवेलला जाणाऱ्या लोकलमध्ये महिलांची हाणामारी, पहा व्हिडिओ .

12 डब्ब्याच्या लोकल मध्ये 1170 जागांपैकी 273 जागा महिलांसाठी राखीव असतात. आता पश्चिम रेल्वे कडून जनरल कम्पार्टमेंट मध्ये बदल करून 25 अधिकच्या जागा महिलांना दिल्या जातील असे सांगितलं आहे. यामुळे एकूण आसन व्यवस्था 298 झाली आहे.

पश्चिम रेल्वे कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अधिकचा महिला डबा हा सार्‍या नॉन एसी लोकल मध्ये केला आहे. त्यामुळे चर्चगेट एंड / विरारचा दुसरा डब्बा हा 25 आसनांसह नवा लेडीज कोच असेल. सध्याच्या लेडीज कोच च्या बाजूलाच हा कोच देखील असणार आहे. 8 ऑक्टोबर पासून ही सेवा सुरु करण्यात आली आहे. नक्की वाचा: Mumbai Local Update: पश्चिम रेल्वेचे उपनगरीय गाड्यांचे नवे वेळापत्रक 1 ऑक्टोबरपासून होणार लागू

काही दिवसांपूर्वी लोकल ट्रेन मध्ये बसण्याच्या जागेवरून महिलांमध्ये हाणामारी झाल्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडीयामध्ये वायरल झाले आहेत.