ठाणे-दिवा मार्गिका (Thane-Diva Track) साठी नुकताच मध्य रेल्वेने (Central Railway) 72 तासांचा जम्बो ब्लॉक घेऊन नवी मार्गिका रेल्वे प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. पण या मार्गिकेवरील अजूनही लहान सहान कामं बाकी असल्याने अजून पाच मेगाब्लॉक घेण्यात येतील अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. हे ब्लॉक 8 ते 12 तासांचे असणार आहेत. विकेंडला अर्थात शनिवार,रविवारी हे मेगा ब्लॉक घेऊन काम पूर्ण केले जाणार आहे. तत्पूर्वी 18 फेब्रुवारीला ऑनलाईन माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) त्याचं उद्घाटन करणार आहेत. यामुळे लोकल फेर्या वाढवल्या जाणार आहेत.
मध्य रेल्वेच्या या ब्लॉकमुळे लोकल सेवा मात्र पुन्हा विस्कळित राहण्याची शक्यता आहे. पण फास्ट लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका असल्याने ब्लॉककाळात पूर्वीच्या तुलनेत कमी त्रास होईल.
पूर्वी ठाणे-दिवा मार्गावर जलद लोकलच्या ट्रॅक वरूनच लांब पल्ल्याच्या गाड्या देखील चालवल्या जात होत्या. त्याचा फटका लोकलच्या फेर्यांना बसत होता. पण स्वतंत्र मार्गिकेचं काम अंतिम टप्प्यांत आहे. नुकत्याच झालेल्या 72 तासांच्या जम्बो ब्लॉक नंतर ती प्रवाशांच्या सेवेमध्ये आली. नक्की वाचा: Mumbai: आता एकाच कार्डने मुंबईत बस, लोकल आणि मेट्रोने प्रवास करता येणार, या महिन्याच्या अखेरीस ही सुविधा होणार सुरू.
आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात काही ब्लॉक होतील. त्या दरम्यान काही ठिकाणी नवीन क्रॉस ओव्हरची कामं होतील. दिवा स्थानकामध्ये फाटकाजवळ असलेली जूनी इमारत पाडण्याचं काम होईल.