Mumbai Local | (Photo Credit - Twitter)

मध्य रेल्वेने (Central Railway) हार्बर रेल्वे मार्गावर (Harbour Railway)38 तासांचा विशेष ब्लॉक जाहीर केला आहे. बेलापूर - पनवेल मार्गावर हा ब्लॉक आहे. हा ब्लॉक 30 सप्टेंबरच्या रात्रीपासून सुरू होणार आहे तो 2 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे. 30 सप्टेंबरच्या रात्री 11 वाजता सुरू झालेला हा ब्लॉक 2ऑक्टोबरच्या दुपारी 1 वाजता संपणार आहे.

ब्लॉक दरम्यान महत्त्वाची कामं केली जाणार आहेत. ज्यात अप आणि डाऊन मार्गावर काही कट आणि कनेक्शन चं काम केले जाणार आहे. ब्लॉक कालावधीत हार्बर आणि ट्रान्सहार्बर या दोन्ही मार्गांवर बेलापूर आणि पनवेल स्थानकांदरम्यान उपनगरीय गाड्या धावणार नाहीत. पनवेलला जाणाऱ्या सर्व UP आणि DOWN उपनगरीय सेवा बेलापूर, नेरूळ आणि वाशी स्थानकांवरून सुरू होतील किंवा संपतील. ट्रान्स हार्बर मार्गावर, ठाणे आणि नेरुळ/वाशी स्थानकांदरम्यान UP आणि DOWN उपनगरीय सेवा चालवल्या जातील.

पहा ट्वीट

सीएसएमटी ते पनवेल दरम्यानची शेवटची लोकल रात्री 10.58 वाजता (30 सप्टेंबरला) सुटणार आहे. दरम्यान या 38 तासांंच्या ब्लॉक मुळे 01/10/23 रविवार रोजी सीएसएमटी-कल्याण मेनलाइन आणि हार्बर लाईन, ट्रान्सहार्बर लाईन मध्ये इतर कोणताही मेगाब्लॉक असणार नाही. अशी महिती देण्यात आली आहे.