Mumbai Local Train: मुंबईतील महिलांच्या लोकल प्रवासासंदर्भात भाजप गप्प का? रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी उत्तर द्यावे- सचिन सावंत
Congress Leader Sachin Sawant (PC - ANI)

मुंबईतील महिलांना 17 ऑक्टोंबर पासून लोकलने प्रवास करण्याची परवानगी ठाकरे सरकारकडून देण्यात आली. त्यामुळे महिला वर्गाला काहीसा दिलासा मिळाल्याचे दिसून आले. मात्र रेल्वे बोर्डाकडून महिलांना लोकलने प्रवास करण्यासाठी दिलेली परवानगी नाकारली गेली. या संदर्भात राज्य सरकारला पत्र लिहिले गेले. त्यात ही 17 ऑक्टोंबर पासून महिलांना लोकलने प्रवास करण्यास बंदी असल्याचे स्पष्ट केले होते. याच कारणावरुन आता काँग्रेस पक्षाचे नेते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटरवर एका व्हिडिओच्या माध्यमातून या संदर्भात आपले मत मांडले असून भाजप या बद्दल गप्पा का? असा सवाल उपस्थितीत केला आहे. तसेच रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी उत्तर द्यावे अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे.

सचिन सावंत यांनी असे म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने रेल्वे बोर्डाला महिलांसाठी मुंबई आणि महानगर क्षेत्रातील महिलांसाठी लोकल प्रवास मोकळा करुन द्यावा असे कळवले होते. कोविडच्या नियमांचे पालन करण्यासह ज्या महिलांकडे योग्य तिकिट आहे त्यांनासकाळी 11 ते दुपारी 3 आणि 7 नंतर प्रवासाची मुभा द्यावी. ऐवढेच नाही तर 17 तारखेपासून नवरात्रौत्सव सुरु असताना अशा पद्धतीने टाळाटाळ करणे हे अत्यंत दुर्दैव आहे. त्याचसोबत जर रेल्वे बोर्डाची या संदर्भात परवानगी आवश्यक आहे. तर ती आधीच का घेण्यात आली नाही असा सवाल रेल्वेच्या सीपीएम यांना विचारण्याची आवश्यकता असल्याचे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.(Mumbai Local Train Update: महिलांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव रेल्वेकडून नामंजूर)

तसेच दुसऱ्या बाजूला भाजपकडून राज्यातील मंदिरे उघडा म्हणून ज्या पद्धतीने राजकरण करत होते. त्याचप्रमाणे नवरात्रौत्सवाच्या वेळी जर मायभगिनींना लोकलने प्रवास करण्याचा उपयोग होईल तर भाजप का आता घंटनाद करत नाही असा प्रश्न आता आम्ही उपस्थितीत करतो असे सचिन सावंत यांनी म्हणत टीका केली आहे.