मुंबईकरांची लाईफलाईन म्हणजेच लोकल सेवा (Mumbai Local Trains) रविवार पासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मागील 16 तासांपासून ठप्प होती. यामुळे चाकरमानी प्रवाशांचे पुरते हाल झाले होते. मात्र आता मध्य (Central Railway) व हार्बर रेल्वे (Harbour Railway) वर धीम्या गतीने लोकलची सेवा सुरु झाली आहे. याबाबत मध्य रेल्वेने ट्विट करून माहिती दिली आहे. मध्य रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते ठाणे (Thane) तर हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते मानखुर्द (Mankhurd) स्टेशनदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
मध्य रेल्वे ट्विट
Regular services from CSMT to Thane/Mankhurd UP and DN resumes
Rest all services are running since morning@drmmumbaicr @mybmc @m_indicator @RidlrMUM @mumbairailusers @mumbai_locals @SlowLocal
— Central Railway (@Central_Railway) July 2, 2019
मुसळधार पावसामुळे सायन-माटुंगा रेल्वे रुळांवर सकाळपासून पाणी साचले होते . यामुळे पालघर, नालासोपारा स्टेशनवर सुद्धा अनेक एक्सप्रेस गाड्या रखडल्या होत्या. सुरवातीला लोकल सेवा 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरु होती. मात्र त्यानंतर पावसाचा जोर कायम राहिल्याने कुर्ला , घाटकोपर, वडाळा या स्टेशनांजवळ ट्रॅकवर पाणी साचले आणि परिणामी दोन्ही मार्गावरील सेवा मध्यरात्रीच्या सुमारास पूर्णपणे ठप्प झाल्या होत्या. Mumbai Rains Traffic Update: नागरिकांचा खोळंबा टाळण्यासाठी मुंबईतील BEST BUS मार्गात बदल
आज दुपारनंतर पावसाने थोडी विश्रांती घेतली मात्र पाणी ओसरायला बराच अवधी गेला. त्यामुळे आता 16 तासांनी मध्य आणि हार्बरची वाहतूक सुरू करण्यात यश आले आहे. संध्याकाळी ४. ४५ च्या सुमारास दोन्ही मार्गांवर सीएसएमटी स्टेशनहून पहिली लोकल रवाना झाली. दरम्यान, ठाणे-कल्याण, ठाणे-कसारा, वाशी-पनवेल या मार्गावरील सेवा मात्र नियमितपणे सुरू असल्याचे सुद्धा मध्य रेल्वे कडून सांगण्यात आले आहे.