Mumbai Rains Traffic Update: नागरिकांचा खोळंबा टाळण्यासाठी मुंबईतील BEST BUS मार्गात बदल
BEST Bus (Photo Credits: PTI)

Mumbai Traffic Advisory: गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची दैना झाली असून मुंबईकर बेहाल झाले आहेत. मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. वाहनांच्या लागलेल्या लांबच लांब रांगामुळे प्रवाशांचे हाल झाले. आज पावसाने विश्रांती घेतली असली तरी पाणी ओसरायला वेळ लागत आहे. त्यामुळे बेस्ट बसच्या मार्गात काही बदल करण्यात आले आहेत. या संदर्भातील माहिती बीएमसीने ट्विट करत दिली आहे.

मुंबईतील बेस्ट बस मार्गातील बदल:

 

पावसामुळे झालेले नागरिकांचे हाल आणि खोळंबा यावर उपाय म्हणून बेस्ट बसच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत.