Mumbai Local For General Public: मुंबई लोकल सेवा सर्व मुंबईकरांसाठी सुरु होण्याची शक्यता, लवकरच होणार निर्णय
Mumbai Local Trains | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटातून राज्य सावरत असताना आणि लॉकडाऊन शिथील केल्यावर विविध सेवा पूर्ववत होत आहेत. मात्र, मुंबईची (Mumbai ) लाईफलाईन असलेली मुंबई लोकल सेवा (Mumbai Local Service) मात्र अद्याप सर्वांसाठी सुरु नाही. त्यामुळे लोकल सेवा सर्वांसाठी कधी खुली होईल यासाठी मुंबईकर (Mumbaikar) डोळे लावून बसला आहे. अशात एक दिलासादायक वृत्त येत आहे. रात्री 10 ते सकाळी 7 या काळात मुंबई लोकल (Mumbai Local Train) सर्वांसाठी खुली होण्याची शक्यता आहे. अर्थात याबाबत अंतिम निर्णय झाला नाही. परंतू, तसा प्रस्ताव विचाराधीन असून मुख्यमंत्र्यांसोबतच्या आढावा बैठकीनंतरच यावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, पहाटे पहिली लोकल सुरु झाल्यापासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत आणि रात्री 10 नंतर मुंबईकरांना लोकलने प्रवास करण्याची मुभा मिळू शकते. मात्र, य प्रवासादरम्यानही प्रवाशांना कोरोना व्हायरस नियंत्रणासाठी राज्य सरकार आणि आरोग्य विभागाने घालून दिलेल्या नियम, अटींचे पालन करावे लागेल.

कोरोना व्हायरस नियंत्रणासाठी मुंबई शहर हे एक आव्हान मानले जात होते. परंतू, मुंबई महापालिकेने कोरोना संकटावर मोठ्या प्रयत्नपूर्वक यश मिळवले आहे. त्यामुळे आता कोणत्याही प्रकारचा धोका न स्वीकारता परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिका प्रयत्नशिल आहे. (हेही वाचा, Mumbai Local Train Timetable: मध्य रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांमध्ये करण्यात आले 'हे' महत्त्वाचे बदल, वाचा सविस्तर)

मंबई लोकल सध्याही सुरु, पण कोणासाठी?

सर्वसामान्यांसाठी खुली नसलेली मुंबई लोकल सध्या सुरु आहे. परंतू ती केवळ अत्यावश्यक सेवा आणि शासकीय कर्मचाऱ्यांसाठी. यात टप्प्याटप्याने वाढ करत वकील, शिक्षक आणि महिलांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली. त्यामुंळे केवळ या लोकांसाठीच मुंबई लोकल सध्या सुरु आहे. मात्र, आता सर्वसामान्यांसाठीही ही सेवा लवकरच खुली होईल अशी आशा आहे.

दरम्यान, मुंबई शहरात लागू असलेली संचारबंदी आज (5 जानेवारी 2021) समाप्त होत आहे. त्यामुळे आजपासून संचारबंदी कायमची समाप्त होत आहे की, प्रशासन ही संचारबंदी पुढे आणखी वाढवणार याबाबत उत्सुकता आहे.