Mumbai Local Megablock: मुंबईच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम या तीनही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक, पाहा असे असेल वेळापत्रक
Megablock Cancelled | Representational Image | (Photo Credits-Facebook)

लॉकडाऊनमुळे मुंबईकरांची जीवनवाहिनी गेले 7 महिने बंद आहे. कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रार्दुभाव रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व लोकांसाठी ही लोकल रेल्वे सुरु करण्यात आलेली नाही. मात्र अनलॉक 5 च्या टप्प्यात हळूहळू पूर्वपदावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांना आज रेल्वे प्रवासादरम्यान कुठलीही अडचण येऊ नये यासाठी घराबाहेर पडण्याआधी आजचे मुंबई लोकल रेल्वेचे वेळापत्रक जाणून घ्या. आज मुंबईच्या मध्य (Central Railway), हार्बर (Harbour Railway) आणि पश्चिम (Western Railway) या तीनही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक (Mega Block) ठेवण्यात आला आहे. यात पश्चिम रेल्वे मार्गावर तर जम्बो मेगाब्लॉक (Jumbo Mega Block) ठेवण्यात आला आहे. साधारणत: सकाळी 10 ते 4 च्या दरम्यान हा मेगाब्लॉक असेल.

या दरम्यान प्रवासांनी गोंधळून न जाता या मेगाब्लॉकचे वेळापत्रक नीट समजून त्यानुसार प्रवास करावा असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.Special Train for UPSC Exam: युपीएससी परीक्षेच्या उमेदवारांना मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करण्याची परवानगी, पण 'या' अटी असणार लागू

असे असेल वेळापत्रक:

1. मध्य रेल्वे

ठाणे-कल्याण अप आणि डाऊन मार्ग

सकाळी 9.30 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत सीएसएमटी डाऊन मार्गावरुन सुटणा-या जलद रेल्वे या मुलूंड ते कल्याण दरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात आल्या आहेत. तर अप मार्गावरील कल्याण वरुन सुटणा-या जलद लोकल सकाळी 11.10 ते दुपारी 3.19 दरम्यान मुलूंडपर्यंत धीम्या मार्गावर वळविण्यात आल्या आहेत.

2. पश्चिम रेल्वे

रेल्वे मार्गावरील तांत्रिकी दुरुस्तीच्या कामामुळे पश्चिमर रेल्वेच्या सांतांक्रूज ते गोरेगाव दरम्यान सकाळी 10.35 ते दुपारी 15.30 वाजेपर्यंत जम्बो मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. या दरम्यान दोन्ही जलद रेल्वे लाईन बंद राहतील. यामुळे सर्व रेल्वे हे या स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात आल्या आहेत.

3. हार्बर रेल्वे

सीएसएमटी ते चुनाभट्टी डाऊन मार्गावर सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 दरम्यान मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. तर चुनाभट्टी ते सीएसएमटी अप मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. सीएसएमटी ते वाशी/पनवेल मध्ये सकाळी 10.15 ते दुपारी 3.40 मिनिटांपर्यंत रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. तर वाशी/पनवेल ते सीएसएमटी सकाळी 8.45 ते 1.45 रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान पनवेल ते कुर्ला या प्रवासासाठी विशेष रेल्वे सेवा सुरु ठेवण्यात आल्या आहेत.

त्यामुळे प्रवाशांनी हे वेळापत्रक पाहूनच त्यानुसार आपला प्रवास योजावा अन्यथा प्रवासादरम्यान अडचणी येऊ शकतात.