मुंबईकरांनो जर तुम्ही दिवाळीच्या खरेदीसाठी घराबाहेर पडत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. मध्य रेल्वेच्या (Central Railway) मुंबई विभागाने शुक्रवारी, 12 नोव्हेंबर 2023 रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कार्ये सुलभ करण्यासाठी त्याच्या उपनगरी विभागांवर मेगा ब्लॉक (Mega Block) जाहीर केला आहे. मध्य रेल्वेने यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. मेगाब्लॉकमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते विद्याविहार अप आणि डाउन धीम्या मार्गावरील सेवांवर सकाळी 10:55 ते दुपारी 3:55 पर्यंत परिणाम होणार आहे. (हेही वाचा - Pune Fire News: वाघोली परिसरातील 12 मजली इमारतीला आग, घटनेत कोणतीही जीवितहानी नाही)
मध्य रेल्वे मुख्य मार्गावर रविवारी सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. सीएसएमटी – विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर हा मेगाब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा जलद मार्गावर वळवण्यात येईल. हार्बर लाईनवर सीएसएमटी – चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल. रविवारी सकाळी 9.53 ते सायंकाळी 5.13 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल.
पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन जलद मार्गावर शनिवारी रात्री 12.15 ते रविवारी पहाटे 4.15 वाजेपर्यंत 4 तासांचा ब्लॉक असेल. ब्लॉकदरम्यान चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील सर्व जलद लोकल धीम्या मार्गावर चालवण्यात येतील. त्यामुळे काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.