Mumbai Mega Block Today: लॉकडाऊनच्या काळात ठप्प असलेली मुंबई लोकल (Mumbai Local) आता पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाली आहे. हळूहळू ट्रॅकवर येत असलेली मुंबई लोकल आता पश्चिम (Western), मध्य (Central) आणि हार्बर मार्गावर (Harbour) धावायला लागली आहे. पण दुरूस्तीच्या, अभियांत्रिकी कामासाठी यंदाच्या विकेंडला म्हणजे 31 ऑक्टोबर, शनिवारची रात्र आणि रविवारी 1 नोव्हेंबर दिवशी या लोकल सेवेसाठी ब्लॉक रेल्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम रेल्वे मार्गावर माहिम ते मुंबई सेंट्रल दरम्यान अप जलद आणि 5व्या रेल्वे मार्गावर शनिवार रात्र 11 वाजल्यापासून रविवार पहाते 4 वाजेपर्यंत जम्बोब्लॉक असेल तर मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर नेहमीप्रमाणेच रविवार (1 नोव्हेंबर) दिवशी 11 ते 4 मेगाब्लॉक असेल. Colour-Coded E-Pass: मुंबई लोकल मध्ये गर्दीचं नियोजन करण्यासाठी 'कलर कोडेड ई पास' यंत्रणेचा होतोय विचार; जाणून घ्या काय आहे हा पर्याय!
पश्चिम रेल्वे मार्गावर मध्यकालीन 5 तासांच्या जम्बोब्लॉक मध्ये रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हर हेड वायर यांच्या देखभालीची कामं केली जातील. त्यामुळे जम्बोब्लॉक मध्ये सांताक्रुझ आणि मुंबई सेंट्रल, कहर्चगेट दरम्यान अप मार्गावरील सर जलद ट्रेन धीम्या मार्गावरून चालवल्या जातील.
मध्य आणि हार्बर मार्गावर अभियांत्रिकी व देखभाल दुरूस्तीच्या कामांसाठी रविवार, 1नोव्हेंबरला मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.या ब्लॉकच्या कालावधी मध्ये हार्बर मार्गावर सीएसएमटी ते वाशी दरम्यान स्पेशल गाड्या चालवल्या जाणार आहेत.
सीएसएमटी येथून सकाळी 9.44 ते दुपारी 3.16 दरम्यान बेलापूर, पनवेलला सुटणार्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार आहे. तर पनवेल वरून दुपारी 2.24 वाजता ठाण्याला जाणारी ट्रान्स हार्बर मार्गावरील अप सेवा व ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे येथून दुपारी 1.24 वाजता पनवेलला जाणारी सेवा देखील बंद राहणार आहेत.
मुंबई लोकल मध्ये सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि सामान्य महिलांना गर्दी नसलेल्या वेळेत म्हणजे सकाळी 11 ते 4 आणि संध्याकाळी 7 ते शेवटची लोकल या काळात प्रवासाची मुभा आहे.