Mumbai Local | (Photo Credit - Twitter)

मुंबई लोकल (Mumbai Local) ही मुंबईकरांची लाईफलाईन आहे. पण रविवारी काही देखभालीच्या कामांसाठी मात्र ती काही काळ प्रवाशांच्या सेवेमधून सुट्टी घेते. या रविवारी अर्थात 11 डिसेंबर दिवशी मुंबई लोकलचा मध्य, हार्बर आणि पश्चिम अशा तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक आहे. त्यामुळे या विकेंडला बाहेर पडण्याचा विचार करत असाल तर रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच तुमचा पुढील प्लॅन बनवा. या रविवारी देखभालीच्या आणि काही दुरूस्तीच्या कामांसाठी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक आहे.

मध्य रेल्वे कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 11 डिसेंबरला उपनगरीय भागात 5व्या आणि 6व्या मार्गिकेचं देखभालीचं आणि काही अभियांत्रिकी काम हाती घेतलं जाणार आहे. परिणामी काही लोकल ट्रेन्स उशिराने आणि काही रद्द केल्या जाणार आहेत. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर तर हार्बर मार्गावरील चुनाभट्टी ते वांद्रे मार्गावर हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील मेगा ब्लॉक सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉकचा परिणाम काही लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही होणार आहे. हटिया-एलटीटी एक्स्प्रेस, हजूर साहिब नांदेड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस, पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस, पुणे-मुंबई डेक्कन क्वीन, 13201 पाटणा-एलटीटी एक्स्प्रेस, काकीनाडा-एलटीटी एक्स्प्रेस, पुणे-मुंबई एक्स्प्रेस, कोईम्बतूर-एलटीटी एक्स्प्रेस या गाड्या कल्याण - ठाणे स्थानकांदरम्यान अप फास्ट मार्गावर वळवण्यात येणार आहेत. नक्की वाचा:  Mumbai Traffic Update: महालक्ष्मी परिसरात आज Feeding India Concert च्या पार्श्वभूमीवर जड वाहनांना 'या' भागात प्रवेशबंदी.  

पहा ट्वीट

रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावरही मेगा ब्लॉक असणार आहे. 11 डिसेंबरला बोरिवली ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन स्लो लाईन वर ब्लॉक असणार आहे. हा ब्लॉक सकाळी 10.35-3.35 दरम्यान असणार आहे.

मुंबई मध्ये तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक असल्याने अनेक गाड्या उशिराने धावण्याची शक्यता आहे. त्यामुळे ब्लॉकच्या काळात जर तुम्ही बाहेर पडणार असाल तर पर्यायी मार्गांची देखील सोय पाहून  ठेवा.