Mumbai Local (Photo Credits: PTI)

मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असलेले लोकल ट्रेन (Local Train) रविवारी देखभालीच्या कामांसाठी उशिराने धावत असते. दरम्यान रविवारी मेगा ब्लॉक (Mega Block) घेऊन ही कामं पूर्ण केली जातात. आज 24 एप्रिल दिवशी मुंबईत मध्य (Central Line) आणि हार्बर मार्गावर (Harbour Line) मेगा ब्लॉक आहे तर पश्चिम रेल्वे मार्गावर रात्रीच्या वेळेस काम हाती घेतल्याने दिवसकालीन मेगा ब्लॉक नसणार आहे.

मध्य रेल्वेवर आज सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान मेगाब्लॉक आहे. सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 पर्यंत सेवा विस्कळित असणार आहे. सीएसएमटी स्थानकातून सुटणार्‍या स्लो ट्रेन विद्याविहार पर्यत फास्ट ट्रॅकवर वळवल्या जातील. घाटकोपर वरून सीएसएमटीकडे चालवल्या जाणार्‍या ट्रेन देखील अप फास्ट मार्गावरून धावतील.

पनवेल-वाशी मार्गावरील रेल्वे सेवा नेरूळ, बेलापूर, खारकोपर या मार्गांवरून चालवल्या जाणार आहेत. तर सीएसएमटी-पनवेल- सीएसएमटी या मार्गावरील रेल्वेसेवा आज 11 ते 4 पर्यंत बंद ठेवली जाणार आहे. नक्की वाचा: कल्याण रेल्वे स्थानकात चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचे देवासारख्या धावून आलेल्या व्यक्तीने वाचवले प्राण, पहा Viral Video .

हार्बर मार्गावर सीएसएमटी-वाशी मार्गावर विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. ठाणे-वाशी/नेरूळ दरम्यानची रेल्वेसेवा सुरळीत धावणार आहे. तर बेलापूर/ नेरूळ - खारकोपर मधील सेवा देखील सुरू राहणार आहे.