कोरोना व्हायरसच्या प्रार्दुभाव रोखण्यासाठी अनेक नोकरदारवर्गाला वर्क फ्रॉम होम देण्यात आले आहे. मात्र तरीही अनेक सरकारी तसेच खाजगी ऑफिसेस सुरु असल्याने त्यांना कामावर जावे लागत आहे. दरम्यान आज (4 एप्रिल 2021) काही तांत्रिक कामाकरिता मध्य (Central Railway) आणि हार्बर रेल्वे (Harbour Railway) मार्गावर मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेत येणा-या वा अन्य प्रवाशांनी याची दखल घेऊन त्यानुसार आपला प्रवास योजावा. यात मध्य रेल्वे मार्गावर ठाणे-कल्याण अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
तर हार्बर मार्गावर पनवेल-वाशी अप-डाऊन मार्गावर आज सकाळी 11.5 ते संध्याकाळी 4.05 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक नाही.
मध्य रेल्वे
ठाणे-कल्याण अप आणि डाऊन रेल्वे मार्गावर सकाळी 11 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. यात मुलूंडहून डाऊन स्लो/सेमी फास्ट सेवा सकाळी 10.47 ते दुपारी 3.46 दरम्यान डाऊन फास्ट मार्गावर मुलूंड ते कल्याण स्टेशनदरम्यान वळविण्यात आल्या आहेत. हा सर्व गाड्या ठाणे, दिवा आणि डोंबिवली स्टेशन दरम्यान थांबतील. या रेल्वे 10 मिनिटे उशिराने स्टेशनावर येतील.
तर कल्याणहून अप स्लो/ सेमी फास्ट सेवा सकाळी 10.37 ते दुपारी 3.51 पर्यंत अप फास्ट मार्गावर कल्याण आणि मुलूंड स्टेशनदरम्यान वळविण्यात आल्या आहेत. या गाड्या डोंबिवली, दिवा आणि ठाणे स्टेशनात थांबतील. या ब्लॉकदरम्यान सर्बन सेवा कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली या स्थानकात थांबणार नाही.हेदेखील वाचा- Coronavirus in Maharashtra: राज्यात पुन्हा जिम, व्यायामशाळांवर निर्बंध येणार? राज्याच्या हिताच्या निर्णयाला जिम चालकांनी सहकार्य करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन
हार्बर रेल्वे
डाऊन हार्बर लाईन सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल/बेलापूर सकाळी 10.03 ते दुपारी 3.16 पर्यंत आणि अप हार्बर सेवा पनवेल/बेलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सकाळी 10.49 ते संध्याकाळी 4.01 वाजेपर्यंतच्या सेवा बंद ठेवण्यात येतील.
अप ट्रान्स हार्बर लाईन पनवेल ते ठाणे सकाळी 11.02 ते 3.53 पर्यंत आणि डाऊन ट्रान्सहार्बर लाईन ठाणे ते पनवेल सकाळी 10.01 ते 3.20 दरम्यान बंद राहतील. दरम्यान छत्रपति शिवाजी टर्मिनस-कुर्ला दरम्यान विशेष रेल्वे सोडण्यात येतील. तसेच ट्रान्सहार्बर सेवा ठाणे-वाशी/नेरूळ स्टेशनदरम्यान रेल्वे सेवा ब्लॉक दरम्यान सुरु राहतील. त्यामुळे प्रवाशांनी त्यानुसार आपला प्रवास योजावा.