मुंबई, ठाण्यामध्ये वीजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाल्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या मुंबई लोकल्स अनेक स्थानकांत थांबल्या आहेत. तसेच काही स्थानकात जलद मार्गावरील ट्रेन्स देखील धीम्या मार्गावरून चालवल्या जात आहेत. परिणामी मध्य रेल्वेचं वेळापत्रक बिघडलं आहे. महाराष्ट्र टाईम्सच्या वृत्तानुसार कोपर स्थानकामध्ये पेंटाग्राफमध्ये बिघाड झाला आहे. कोपर स्थानकामध्ये पेंटाग्राफमध्ये ठिणग्या उडत आहेत.
उद्या (11 जून) दिवशी हे कोकणासह पश्चिम किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वायू चक्रीवादळामुळे उद्या मुंबई, ठाणेसह कोकण परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने या काळात मच्छिमार्यांनी अरबी समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे.