Mumbai Local (फोटो सौजन्य - फेसबुक)

मुंबई लोकलच्या (Mumbai Local) पश्चिम रेल्वे मार्गावरील लोअर परेल (Lower Parel) स्थानकामध्ये Electronic Interlocking बसवण्याच्या कामासाठी 27 डिसेंबर च्या रात्री पासून ते 28 डिसेंबरच्या पहाटे पर्यंत एक विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. हा 5 तासांचा ब्लॉक असणार आहे. यामध्ये 27 डिसेंबरच्या रात्री 11.30 पासून कामाला सुरूवात होणार असून 28 डिसेंबरच्या पहाटे 4.30 पर्यंत काम चालणार आहे. त्यामुळे या काळात रेल्वेसेवा बंद राहणार आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉकच्या काळामध्ये मुंबई सेंट्रल ते माहीम स्थानकादरम्यान सार्‍या धीम्या मार्गावरील गाड्या फास्ट लाईन वर चालवल्या जातील. त्यामुळे महालक्ष्मी, लोअर परेल, प्रभादेवी, माटुंगा रोड आणि माहीम स्थानकावर ट्रेन थांबणार नाहीत. नक्की वाचा: Mumbai Local Train News Update: मुंबईकरांना दिलासा! पश्चिम रेल्वे 27 नोव्हेंबरपासून आणखी 13 एसी ट्रेन सेवा चालवणार, जाणून घ्या सविस्तर .

रेल्वे प्रशासनाकडून माहिती

ब्लॉकच्या काळामध्ये अप आणि डाऊन मार्गावरील काही धीम्या लोकल्स देखील रद्द केल्या जाणार आहेत. या बदलांनुसार प्रवाशांनी आज रात्री त्यांचा प्रवास आयोजित करण्याचं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलं आहे. लोअर परेल स्थानकामध्ये अत्याधुनिकरणाच्या कामाच्या भाग म्हणून काही गोष्टी करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे.

29  डिसेंबरचा मेगाब्लॉक  मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर

दरम्यान दर रविवारी घेतला जाणारा मेगाब्लॉक या राविवारी केवळ मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर असणार आहे. रविवारी 29 डिसेंबर दिवशी पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक नसेल.