Central Railway AC Local | Photo Credits: Twitter

मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा नववर्षात प्रवास गारेगार होणार आहे. सध्य मुंबईमधील कुर्ला कारशेडमध्ये दाखल करण्यात आलेली नवी एसी लोकल ट्रेन जानेवारी 2020 मध्ये मुंबईकरांच्या सेवेसाठी रूजू होणार आहे. ही ट्रेन मध्य मार्गावरील मेन लाईनवर धावणार की ट्रान्स हार्बर लाईनवर धावणार याबाबत अद्याप कोणतीच माहिती मिळालेली नाही, मात्र लवकरच ही बाब देखील स्पष्ट होईल. मात्र TOI सोबत बोलताना रेल्वे अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धाटनाच्या वेळेस महिला मोटारमॅन आणि गार्डला हा मान दिला जाईल. असे सांगण्यात आले आहे.

दरम्यान मुंबईमध्ये यापूर्वी डिसेंबर 2017 पासून चर्चगेट ते विरार या पश्चिम रेल्वेमार्गावर एसी लोकल चालवली जात आहे. त्यामुळे आता ही लोकल पश्चिम लोकलप्रमाणेच मध्य रेल्वे मार्गावर देखील धावणार असल्याने मध्य प्रवाशांसाठी ही खूषखबर आहे. यापूर्वी एसी लोकल आणि प्लॅटफॉर्मची उंची यामध्ये तफावत होती. मात्र आता सर्वच लोकलची उंची कमी करण्यात आली आहे. त्यामुळे नवी एसी लोकल आता सीएसएमटी पासून कल्याण, खोपोली मार्गावरही धावू शकते.

पियुष गोयल यांचं ट्वीट 

मुंबईमध्ये दाखल करण्यात आलेली एसी लोकलमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचं काम सुरू आहे. सोबतच या लोकल ट्रेनच्या देखभालीचं, दुरूस्तीचं प्रशिक्षण मध्य रेल्वेच्या कर्मचार्‍यांना देण्याचं काम सुरू आहे.