Kurla Limbu Pani (Photo Credits-YouTube)

मुंबई: कुर्ला येथील रेल्वेस्टेशन नजीक लिंबू सरबत विक्रेत्याचा व्हिडिओ मार्च महिन्यात सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यामध्ये विक्रेता अत्यंत वाईट पद्धतीने लिंबू सरबत बनवताना दिसून आल्याने लोकांनी त्याच्याविरुद्ध संताप व्यक्त केला. त्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाकडून त्या विक्रेत्यावर बंदी घातली. तसेच त्याच्या लिंबू सरबताची चाचणी केली असता आरोग्यास बाधा होते असे सिद्ध झाले. त्यामुळे आता या विक्रेत्यास मध्य रेल्वे प्रशासनाकडून पाच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

लिंबू सरबताची चाचणी केली असता यामुळे नागरिकांना मूत्राशय संसर्ग, न्युमोनियासह ई-कोलाय हे जीवाणू जास्त प्रमाणात दिसून आले. या सर्व गोष्टींमुळे नागरिकांच्या आरोग्यास अपाय होऊन ताण वाढणे किंवा अतिसार होण्याची शक्यता असल्याचे समोर आले आहे. तर मध्य रेल्वेनेसुद्धा कठोर पावले उचलत रेल्वे स्थानकावरील खाद्यपदार्थांची चाचणी करण्यात येत आहे. ग्राहकांना स्वच्छ आणि उत्तम दर्जाचे खाद्यपदार्थ पुरवावे असे विक्रेत्यांना सांगण्यात आले असून कोणत्याही पद्धतीचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.(Video): रेल्वे स्थानकावर लिंबू पाणी बनवण्याचा किळसवाणा प्रकार; दुकानदारावर कारवाई

या सर्व प्रकारामुळे आता रेल्वे स्थानकांवर पॅकिंग केलेल्या शीतपेयांची मागणी वाढली आहे. त्यामुळे आता रेल्वे स्थानकावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी पॅकिंग असलेली शीतपेये विक्रिस ठेवली असून ग्राहकांना आता 20 रुपयापेक्षा जास्त पैसे मोजावे लागत आहेत.