कोहिनुर मिल प्रकरणी ईडीकडून करण्यात येणाऱ्या चौकशीसाठी सहकार्य करणार, उन्मेश जोशी यांची प्रतिक्रिया
Unmesh Joshi (Photo Credits-ANI)

मुंबईतील (Mumbai) शिवाजी पार्क येथील टोलेजंग इमारत कोहिनुर मिल (Kohinoor Square) प्रकरणी ईडी (ED) कडून चौकशी करण्यात येत आहे. तर मनसे (MNS)अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सुद्धा या प्रकरणी समील आहेत. त्यामुळे त्यांना 22 ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावर मनसे प्रवक्ता संदिप देशपांडे यांनी राज ठाकरे यांचे समर्थन केले आहे. तसेच माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेश जोशी (Unmesh Joshi) यांनासुद्धा ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली होती.

आज (19 |ऑगस्ट) उन्मेश जोशी यांनी ईडीने पाठवलेल्या नोटीस नंतर त्यांच्या कार्यालयात उपस्थिती लावली. तसेच ईडीकडून कोहिनुर मिलची करण्यात येणाऱ्या चौकशीसाठी सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र नोटीसपूर्वी कोणत्याही प्रश्नांबद्दल मला माहिती देण्यात आली नसल्याचे ही उन्मेश जोशी यांनी म्हटले आहे.(कोहिनुर मिल प्रकरणी राज ठाकरे यांना ईडी कडून नोटीस, भाजपच्या 'हिटलरशाही' विरोधात आवाज उठवणार संदिप देशपांडे यांची प्रतिक्रिया)

ANI ट्वीट:

कोहिनुर मिल क्रमांक 3 च्या जागेचा काही भागाचा लिलाव करण्यात आला होता. 421 कोटी रुपयांना या जागेचा लिलाव केला गेला. लिलाव केल्यानंतर ही जागा मनोहर जोशी यांच्या मुलाने घेतली. यामध्ये राज ठाकरे, राजन शिरोडकर आणि मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेश हे तिघे समान भागीदार होते. या मिलच्या जागेची खरेदी करताना उन्मेश याने आयएल अॅण्ड एफएलस सोबत घेतले होते.