मुंबईत (Mumbai) आता लवकरच शाळा आणि रुग्णालयाबाहेर मिळणाऱ्या जंक फूडवर बंदी घालण्यात येणार आहे. तसेच नवीन फेरीवाला धोरणानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा आणि 100 रुग्णांची क्षमता असणाऱ्या रुग्णालयाबाहेर चणे,शेंगदाणे, फळे आणि नारळ पाणी व्यतिरिक्त कोणतेही खाद्यपदार्थ विकता येणार नाहीत.
महापालिकेने फेरीवाला धोरणाअंतर्गत हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लवकरच शाळा आणि रुग्णालयाबाहेरील नजीकच्या अंतरावरील खाऊ गल्ल्या बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फेरीवाल्यांना आता तळलेल्या पदार्थ 100 मीटर अंतराच्या आतमध्ये विकता येणार नाहीत.
तसेच धार्मिक स्थळांसाठी ही या नियमाची अंमलबजावणी केली आहे. तर मंदिर परिसरात फक्त प्रार्थनेशी संबंधित वस्तू विकण्याबर बंदी घालण्यात आलेली नाही. मात्र सरकारी आणि खासगी कंपन्यांसमोर जंक फूड विकण्यासाठी कंपन्यांच्या कामाच्या वेळेत त्यांना धंदा करता येणार आहे.