Beaches in India | Representational Image. (Photo Credits: Pixabay)

मुंबईच्या जुहू चौपाटीवर (Mumbai Juhu Beach) जर तुम्ही फिरायला जात असाल तर सावधान कारण मागील आठवडाभरापासून जेलीफिश मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. जुहू चौपाटीवर फिरण्यासाठी आलेल्या सहा पर्यटकांना या जेलीफिश माशांनी दंश केल्याची (Jellyfish Attack)घटना घडली आहे. यामध्ये चार ते सहा वयोगटातील दोन मुले आणि एका मुलीचा समावेश आहे. जुहू चौपाटीवर जाणाऱ्या मुंबईकरांनी काळजी घेण्याचे आवाहन मुंबई महापालिकेने (BMC) केले आहे.  जेली फीश हे पायाला चिकटत असल्याने ते सहज काढता येत नाहीत. यामुळे मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांनी फिरण्यासाठी जाऊ नये असे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे. (हेही वाचा - Maharashtra Rain Forecast: शेतकऱ्यांना दिलासा मिळणार; राज्यात उद्यापासून पाऊस पुन्हा सक्रीय होण्याचा अंदाज)

रविवारी सकाळच्या सुमारास जुहू चौपटीवर सहा जणांना जेलीफिशने दंश केला. मेहताब शेख (20), दिक्षाद मेहता (5), मोहम्मद मसुरी (4), मेटवीश शेख (6), मोहम्मद राजौल्लाह (22) आणि आराथ्रीहा प्रमूह (25) अशी जेली फीश ने दश केलेल्या व्यक्तींची नावे आहेत. या सर्वांवर मुंबई महानगरपालिकेच्या विलेपार्ले पश्चिमेकडील कूपर रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

दरवर्षी पावसाळ्यात मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर जेलीफिश मोठ्या प्रमाणात दिसून येत असतात.  ब्ल्यू बॉटल जेलीफिश साधारणता विषारी असतात. ते एका निळ्या पिशवी सारखे दिसतात. त्यांच्या दंशाने माणसाला असह्य वेदना होतात. जेलफीशने दंश केल्यानंतर त्या ठिकाणी  बर्फ चोळावा आणि त्यानंतर त्या ठिकाणी लिंबाचा रस लावावा.