मुंबई (Mumbai) मधील प्रसिद्ध जसलोक रुग्णालयात (Jaslok Hospital) एका 11 वर्षीय तरुणाने गिळलेला कोरडा सेल फुफ्फुसातून बाहेर काढण्यास डॉक्टरांना यश आले आहे. तर मुलाने सेल चुकून गिळल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच सेल फुफ्फुसात अडकल्याने त्याला रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मुलाने गिळलेला सेल फुफ्फुसात अडकून राहिल्याने त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे उपचार तातडीने करणे अत्यंत गरजेचे असल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया करताना मुलाचे वय लहान असल्यामुळे भीती होती. परंतु ती यशस्वीरित्या पार पडली असल्याचे जसलोक रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले आहे.(अमरावती: प्रियकराच्या गुप्तांगावर प्रेयसीने भिरकावला दगड; पीडिताच्या आईची पोलिसात धाव; रक्तबंबाळ तरुणावर ICU मध्ये उपचार)
तर सेल गिळल्याने त्यामधील अॅसिड बाहेर येऊन पसरत असल्याचे डॉक्टरांना दिसून आले. तर या अॅसिडमुळे मुलाच्या आरोग्याला अधिक धोका पोहचू नये यासाठी तातडीने त्याच्यावर उपचार करण्यास सुरुवात केली. तर मुलाची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्यानंतर अवघ्या 24 तासात त्याला घरी सोडण्यात आले आहे.