मुंबई: रेल्वे प्रशासनाचा स्त्युत्य प्रयोग! चर्चगेट स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी 'रीसाइकल्ड प्लास्टिक' पासून बनवलेले 3 खास बेंचेस
Plastic Bench (Photo Credits: Twitter/ RailMinIndia)

प्लॅस्टिकचा वापर केवळ पर्यावरणासाठीच नव्हे तर मानवी आरोग्यालाही त्रासदायक आहे. प्लॅस्टिकचा पुनर्वापर करण्याचं टाळण्यासाठी काही दिवसांपासून विविध स्तरांमधून कार्यक्रम राबवले जात आहे. आता मुंबईमधील चर्चगेट स्टेशनवर (Churchgate Station) प्लॅस्टिकचा वापर करून खास बेंच बनवण्यात आले आहे. टिकाऊ, मजबूत असे 3 बेंचेस चर्चगेट स्टेशनमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. यामुळे वाढत्या प्रदुषणात भर पडणार्‍या गोष्टी रोखण्यास मदत होणार आहे.

मागील काही वर्षांपासून मुंबईत चर्चगेटसह काही पश्चिम मार्गावरील स्टेशनवर प्लॅस्टिक रिसायकल करणारी काही उपकरणं बसवण्यात आली आहेत. यामुळे प्रवाशांना प्लॅस्टिकच्या वस्तू टाकण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्याच्याबदल्यात ग्राहकांना काही रिवॉर्ड पॉंईंट्स देखील मिळतात.

पश्चिम रेल्वे ट्वीट

सध्या भारत सरकार कडून 'Singal Use Plastic' टाळण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. आज गांधीजींच्या 150 व्या जयंतीचं औचित्य साधत खास भारतामध्ये प्लॅस्टिक बंदी लागू करण्यात आली आहे.