आज मुंबईतील माझगाव डॉकयार्ड येथे इंडियन नेव्ही सबमरिन Vela प्रोजेक्ट-75 लॉन्च होणार
Submarine Vela of Project 75 (Photo Credits-ANI)

मुंबईतील (Mumbai) माझगाव डॉक लिमिटेड (Mazagon Dock Limited) येथे आज (6 मे) इंडियन नेव्ही (Indian Navy) सबमरिन वेला प्रोजेक्ट-75 (Submarine Vela project-75) लॉन्च होणार आहे. तर दीर्घ कालांतरांच्या प्रतिक्षेनंतर स्कार्पिन श्रेणीतील हा प्रोजेक्ट आहे. इंडियन नेव्हीच्या पानबुडी मधील ही चौथी पानबुडी असणार असून त्याचे काम पूर्ण झाले आहे. स्कॉर्पिन पानबुड्यांचा प्रोजेक्ट मुंबईतील डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड आणि फ्रांन्स कंपनी नवल ग्रुप यांच्या सहाय्याने चालवला जाणार आहे.

तर आता भारतीय नौसेनेची ताकद अधिक मजबूत करण्यासाठी गेल्या डिसेंबर पासून प्रयत्न सुरु होते. भारतीय नौसेनेत पहिल्यांदाच बलिस्टिक मिसालईल लेस पानबुडी आयएनएस अरिहंत यांनी त्यांचे पेट्रोलिंग पूर्ण केले आहे. नौसेनेला स्कॉर्पिन सीरिजमधील पहिली पानबुडी आयएनएस कलवरी गेल्या डिसेंबर महिन्यात सामील केली गेली. त्याचसोबत आयएनएस खंडेरी आणि आयएनएस करंज पुढील महिन्यात नौसेनेमध्ये सामील होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.(जेट एअरवेज प्रकरणी शरद पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र)

तसेच नौसेनेची ताकद अधिक मजबूत व्हावी यासाठी वारंवार मागणी केली जात आहे. त्यामुळे आज आयएनएस वेला आज लॉन्च होणार असल्यामुळे नौसेना आधुनिकीकरणाच्या मार्गाने पुढे जाण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलत असल्याचे म्हटले जात आहे.