उत्तर प्रदेश (Utter Pradesh) येथे एका नवऱ्याने आपल्याला मुलगी झाली म्हणून बायकोला तिहेरी तलाक देत घराबाहेर काढल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पतीवर उत्तर प्रदेशात गुन्हा दाखल झाल्याने त्याने मुंबईत पळ काढला. मात्र त्याला अटक करुन बिहार येथील पोलिसांकडे सोपवा अशी मागणी पीडित महिलेने केली. परंतु आमच्या हद्दीत हा प्रकार घडला नसल्याचे पतीला अटक करु शकत नाही असे पोलिसांनी त्या महिलेला उत्तर दिले.
कुर्ला येथे राहणारी साबरीन खातून हिचा निकाह मोहम्मद सोबत झाला होता. तर गेल्या वर्षी साबरीन हिने मुलीला जन्म दिला. परंतु तेव्हापासून सासरच्या मंडळींनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली. तसेच माहेरहून महागड्या वस्तू घेऊन ये असे वारंवार सांगण्यात आले. परंतु साबरीन हिने सासरच्या मंडळींना याबद्दल नकार देताच तिला मारहाण करण्यास सुरुवात केली.(डोंबिवली: कोपर रेल्वे स्थानकात TC ला मारहाण करणारा प्रवासी अटकेत)
तर पीडित साबरीन हिच्या वडीलांनी या प्रकरणी विचारले. तसेच आता वृद्ध वयात एवढे पैसे आणि महागड्या वस्तू देणे शक्य नसल्याचे सांगताच त्यांना सुद्धा मारहणा करण्यात आले. त्यामुळे नवजात मुलीच्या जीवाला कोणताही धोका पोहचू नये म्हणून साबरीन ही मुंबईत आली. त्यानंतर तिने मुंबईच्या पोलिसात याबद्दल तक्रार केली आहे.