rape | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

विरारमध्ये (Virar) बलात्काराचे (Rape) एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या ठिकाणी डॉक्टर-डॉक्टर खेळण्याच्या बहाण्याने एका तरुणाने 12 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. मुलगी गरोदर राहिल्यानंतर ही बाब उघडकीस आली. आरोपीने स्वतःचे वय 17 वर्षे असल्याचे सांगितले. मात्र, तपासात तो 18 वर्षांचा असल्याचे समोर आले. या प्रकरणात एका 15 वर्षांच्या मुलीनेही त्याला साथ दिली, त्यामुळे पोलीस तिचाही शोध घेत आहेत. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.

ही घटना गेल्या महिन्यात ऑगस्ट 2023 मध्ये घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 15 वर्षीय मुलीने पीडितेला डॉक्टर-डॉक्टर खेळण्यासाठी तिच्या घरी बोलावले. यावेळी तिला बेडरूममध्ये नेण्यात आले त्याच वेळी आरोपी मुलालाही बोलावण्यात आले. यानंतर 15 वर्षीय तरुणीने दोघांनाही बेडरूममध्ये बंद केले व ती तेथून निघून गेली. यानंतर आरोपीने मुलीवर बलात्कार केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास तिच्या लहान बहिणीसोबतही असेच कृत्य केले जाईल अशी धमकी दिली.

यामुळे घाबरलेल्या तरुणीने याबाबत कोणालाच सांगितले नाही. त्यानंतरही आरोपीने मुलीला घरी बोलावून त्रास देणे सुरूच ठेवले होते. मात्र पीडित मुलगी काही दिवसांनी गर्भवती राहिल्याने ही घटना उघडकीस आली. याबाबत पीडित मुलीच्या आईने मुलीला विचारले असता, पीडितेने आपल्यासोबत झालेल्या अत्याचाराची कहाणी सांगितली. याप्रकरणी बुधवारी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी विरार पोलिसांनी दोन अल्पवयीन आरोपींविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (हेही वाचा: वासनांध सासऱ्याचा गर्भवती सुनेवर बलात्कार; निर्दयी नवऱ्याने पीडित पत्नीला काढले घराबाहेर, म्हणाला 'आता ही झाली माझी आई')

दरम्यान, याआधी उदयपूरच्या हिरण मगरी परिसरात गेल्या महिन्यात एका अल्पवयीन मुलाला त्याच्या बहिणीच्या मदतीने 15 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात सहभागी झाल्यामुळे त्याच्या बहिणीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.