धारावीतील शाहूनगर पोलीस ठाण्याला गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट; पोलीस निरीक्षक अमोल कुलकर्णी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वाहिली श्रद्धांजली

महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे संकट गडद होत असल्याचे चिन्ह दिसू लागली आहेत. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि पोलीस आपल्या जीवाची बाजी लावून कर्तृव्य बजावत आहे. दरम्यान, कोरोना विषाणूशी लढत असताना पोलीस निरीक्षक अमोल हनुमंत कुलकर्णी (Amol Kulkarni) यांचा मृत्यू झाला आहे. यातच महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी धारावीतील (Dharavi) शाहूनगर पोलीस ठाण्याला (Shahunagar Police Station) भेट देऊन अमोल कुलकर्णी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहली आहे. गेल्या काही दिवासांपासून अमोल कुलकर्णी यांना ताप आणि सर्दीचा त्रास जाणवत होता. यामुळे त्यामुळे कुलकर्णी यांनी रुग्णनिवेदन केले होते आणि घरीच राहण्यासाठी अर्ज केला होता. कोरोनाची चिंताजनक परिस्थितीत असल्यामुळे अमोल कुलकर्णी यांनी सायन रुग्णालयात जाऊन 13 मे रोजी कोरोनाची चाचणी केली होती. त्यात अमोल कुलकर्णी यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. यातच अमोल कुलकर्णी यांच्या मृत्यूने संपूर्ण पोलीस प्रशासन हादरून गेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास अमोल कुलकर्णी हे आपल्या राहत्या घरातील बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आले होते. त्यांना तातडीने सायन रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी कुलकर्णी यांना तपासून मयत घोषित केले, अशी माहिती शाहूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास गंगावणे यांनी दिली. तसेच, अमोल कुलकर्णी यांच्या मृत्यूबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. हे देखील वाचा- राज्यात काल एका दिवसात 5 हजार 434 ग्राहकांना घरपोच मद्य विक्री; नागपूर व लातूर येथील ग्राहकांनी मागवली सर्वात जास्त दारू

ट्वीट-

पोलीस दलातील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून 55 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या पोलिसांना घरी राहण्याच्या सूचना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आला आहेत. मुंबई पोलीस दलात आतापर्यंत जवळपास 600 च्या आसपास पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर , राज्यात आतापर्यंत 1 हजार 140 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून त्यामध्ये 112 पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. तर या आजारात 10 पोलिसांनी आपला जीवही गमावला आहे.