Mumbai High Tides Schedule 2021: मुंबईतील समुद्रात 'या' दिवशी उसळणार मोठ्या लाटा, IMD कडून वेळापत्रक जाहीर
Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

Mumbai High Tides Schedule 2021:  मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात होण्यापूर्वी शहरातील काही ठिकाणी अधूनमधून पावसाच्या सरी कोसळताना दिसून येत आहेत. तर रविवारी रात्री सुद्धा पावसाच्या सरी मुंबईत कोसळ्याच्या दिसून आल्या. अशातच हवामान विभागाने येत्या 10 जून पासून मुंबईत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मुंबईसह किनारपट्टी भागात सुद्धा अशाच पद्धतीच्या पावसाचा अंदाज आहे. परंतु IMD कडून पावसाच्या पार्श्वभुमीवर समुद्रात भरती कधी येणार आणि किती उंचीच्या लाटा उसळण्यासह वेळेबद्दल एक वेळापत्रक जाहीर केले आहे.(मुंबई सह कोकणात पुढील 4 दिवस अतिवृष्टीच्या शक्यतेचे; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यंत्रणांना सज्ज करत रूग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना)

मुसळधार पावसाला ज्या वेळी सुरुवात होते तेव्हा समुद्रात उंचच उंच लाटा उसळताना दिसून येतात. अशावेळी नागरिकांसह मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन केले जाते. तसेच बोटी सुद्धा किनाऱ्याला लावण्यास सांगितले जाते. तर IMD कडून समुद्रात भरती कधी येणार त्याबद्दल ट्विट करत माहिती दिली आहे.(Mumbai Rains: मुंबई मध्ये आज वीजांच्या कडकडाटासह सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज)

Tweet:

तर  केरळ मध्ये 3 जूनला मान्सून दाखल झाल्यानंतर आता 7 ते 10 जून पर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज आहे. यानुसार आता कोकण किनारपट्टी प्रमाणे राज्यात इतर जिल्ह्यांमध्येही मान्सून दाखल होण्यास सुरूवात झाल्याची माहिती देण्यात आली आहे. यंदा हवामान खात्याने सरासरीच्या तुलनेत चांगला पाऊस बरसेल असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिक देखील सुखावले आहेत.