संततधार पावसामुळे मुंबईतील (Mumbai Rains) जनजीवनावर गंभीर परिणाम झाला आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) पुढील 2-3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे शहरासमोरील आव्हाने वाढू शकतात. तसेच परिस्थीसुद्धा आणखी बिकट होऊ शकते. दरम्यान, मुंबईच्या समुद्रात भरती (Mumbai Tide Forecast) येणार असल्याने मुंबई पोलिसांनी एक ॲडव्हायझरी (Mumbai Police Issues Advisory) जारी करून नागरिकांना मुसळधार पावसामुळे किनारी भाग टाळण्यास सांगितले आहे. जाणून घ्या मुंबई पोलिसांचे अवाहन आणि समुद्रातील भरती-ओहोटी वेळ.
मुंबई समुद्रात आज आणि उद्या भरती
मुंबई महापालिका म्हणजेच बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहर व उपनगरात जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईच्या समुद्रात आज आणि उद्या भरती पाहायाल मिळू शकते. या वेळी समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या लाटा उसळू शकतात. (हेही वाचा, Mumbai Rain Alert: मुंबईत येत्या 24 तासांत अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज; तिन्ही मार्गावरील लोकल सेवा उशीरा)
22 आणि 23 जुलै रोजीचा भरती-ओहोटी कालावधी
सोमवार (22 जुलै):
High Tide (भरती) - दुपारी - 12.50 वाजता - 4.59 मीटर
Low Tide (ओहोटी) - सायंकाळी - 06.57 वाजता -1.55 मीटर
मंगळवार (23 जुलै):
High Tide (भरती): मध्यरात्री - 12.45 वाजता -4.07 मीटर
Low Tide (ओहोटी): सकाळी - 06.36 वाजता - 0.33 मीटर
विमानांची उड्डाणे रद्द, विमानतळावरही व्यत्यय
मुसळधार पावसामुळे काल (21 जुलै) मुंबई विमानतळावरील 36 उड्डाणे रद्द करण्यात आली. तसेच, खराब हवामानामुळे दिवसभरात सुमारे तासाभरात दोनदा धावपट्टीचे कामकाज थांबवण्यात आल्याचे विमानतळ प्राधिकरणाने सांगितले. (हेही वाचा, Ratnagiri Flood Situation: कोकणात मुसळधार पाऊस, रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा पूरस्थिती)
हवामान अंदाज आणि पाऊस
IMD ने सोमवारी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करत मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. 23 जुलैसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रविवारी सकाळपासून आर्थिक राजधानीत मुसळधार पाऊस पडत आहे. 21 जुलै रोजी रात्री 8 वाजेपर्यंत मुंबई आणि उपनगरात 12 तासांत 100 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला.
एक्स पोस्ट
🗓️ २२ जुलै २०२४
⛈️☔ मुंबई शहर व उपनगरात जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
🌊 भरती - दुपारी - १२:५० वाजता - ४.५९ मीटर
ओहोटी - सायंकाळी - ०६:५७ वाजता - १.५५ मीटर
🌊 भरती - (उद्या - दि.२३.०७.२०२४) मध्यरात्री - १२:४५ वाजता -…
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 22, 2024
शहरभर व्यत्यय, जनजीवनावर परिणाम
सततच्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले असून, लोकल ट्रेन आणि शहरातील रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. प्रतिकूल हवामानामुळे अनेक विमाने स्थगित करण्यात आली असून, उड्डाणेही वळवण्यात आली.
एक्स पोस्ट
#Mumbai Police issues advisory asking citizens to avoid going out in coastal areas in view of heavy #rainfall in the city.
36 flights cancelled at Mumbai airport yesterday due to heavy rains. Airport authority informed that during the day, runway operations were suspended twice…
— All India Radio News (@airnewsalerts) July 22, 2024
राज्यभर पावसाचा अंदाज
IMD ने रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांसह महाराष्ट्रातील अनेक भागात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. ठाणे, पुणे, पालघर आणि नागपूरसह 16 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
NDRF तैनाती आणि सरकारचा प्रतिसाद
अतिवृष्टीच्या इशाऱ्याला प्रतिसाद म्हणून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या टीम्स संपूर्ण महाराष्ट्रात तैनात करण्यात आल्या आहेत. वसई (पालघर), ठाणे, घाटकोपर, पवई (कुर्ला), महाड (रायगड), खेड आणि चिपळूण (रत्नागिरी), कुडाळ (सिंधुदुर्ग), कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे पथके मुंबई आणि नागपूर येथे नियमित NDRF पथके तैनात आहेत.
मुसळधार पावसामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांनी यावर भर दिला की, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, स्थानिक प्रशासन, नागरी संस्था आणि पोलिसांनी नागरिकांना वेळेवर दिलासा देण्यासाठी IMD च्या हवामान अहवालाच्या आधारे त्यांच्या योजना नियमितपणे अद्ययावत केल्या पाहिजेत.