Heavy Rains Lash Mumbai (Photo Credits: IANS/Representative Image)

मुंबईत (Mumbai) 26 जुलै 2005 रोजी मुसळधार पावसाने मुंबईकरांना झोडपले होते. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होत हजारोंपेक्षा अधिक नागरिकांना आपला जीन गमवावा लागला होता. मुंबईत घडलेल्या या भीषण पुराच्या परिस्थितीमुळे सर्वांच्या मनात भीती कायम आहे. मात्र या वर्षीसुद्धा पुन्हा एकदा 26 जुलैची पुर्नरावृत्ती होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गेल्या दोन-तीन दिवसापासून राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्याचा परिणाम वाहतूकीवर सुद्धा झाला. परंतु येत्या 26 जुलैला पुन्हा एकदा मुंबईत अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्याचसोबत कोकणातील उत्तर आणि दक्षिण भागात सुद्धा पावसाचा तडाखा बसणार आहे. (मुंबई ते पुणे दरम्यान तांत्रिक दुरुस्ती; सिंहगड तसेच प्रगती एक्स्प्रेस तब्बल आठ दिवस बंद, अनेक ट्रेनच्या मार्गात बदल)

तर कोकणात सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे खेड येथील जगबुडी आणि नारंगी या नद्यांची पातळी वाढली आहे. त्यामुळे नद्यांच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मुंबईतसुद्धा पुढील 24 तासात अतिमुसळधार पाऊस पडणार आहे.