मुंबई ते पुणे दरम्यान तांत्रिक दुरुस्ती; सिंहगड तसेच प्रगती एक्स्प्रेस तब्बल आठ दिवस बंद, अनेक ट्रेनच्या मार्गात बदल
प्रगती एक्स्प्रेस (Photo Credit : Wikimedia Commons)

सध्या स्कायमेटच्या (Skymet) अंदाजानुसार मुंबई परिसरात मुसळधार पाऊस पडणार आहे. या पावसाचा सर्वात जास्त परिणाम होतो तो सार्वजनिक वाहतूकीवर. म्हणूनच आता काही तांत्रिक दुरुस्ती व अन्य कामांसाठी मुंबई-पुणे (Mumbai Pune) रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक बंद राहणार आहे. ही वाहतूक 26 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान, म्हणजेच आठ दिवस बंद असणार आहे. या गोष्टीचा सर्वात मोठा फटका सिंहगड एक्स्प्रेस (Sinhagad Express) व प्रगती एक्स्प्रेसने (Pragati Express) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होणार आहे.

लोणावळा ते कर्जत या दरम्यान हे दुरुस्तीचे काम चालू होणार आहे. या काळात दरड कोसळणे किंवा इतर काही अपघात होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे इतर काही रेल्वे गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत किंवा गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

या आठ दिवसांत कोयना, सह्यादी, महालक्ष्मी एक्स्प्रेस यांसारख्या मुंबईहून सुटणाऱ्या गाड्या आता पुण्यावरून सुटणार आहेत. या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून लोकांनी पर्यायी व्यवस्थेचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. (हेही वाचा: मुंबई शहर उपनगरात सखल भागात पाणी साचले, अपघाताच्या घटना, कोकण विभागात अतिवृष्टीचा इशारा)

असे आहेत वाहतुकीतील बदल -

> पुणे-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस रद्द

> नांदेड-पनवेल ही गाडी पुण्यापर्यंतच धावणार.

> पुणे-पनवेल-पुणे शटल सेवा रद्द

>  पुणे-भुसावळ ट्रेन मनमाड मार्गे धावणार