गुड्स अॅण्ड सर्विस टॅक्स (GST) विभागातील ज्येष्ठ अधिकारी हरेंद्र कपाडीया यांनी आत्महत्या केली आहे. ते 51 वर्षांचे होते. दक्षिण मुंबईतील कफ परेड (Cuffe Parade) परिसरातील वर्ल्ड ट्रेड सेंटर (World Trade Centre) इमारतीच्या ३० व्या मजल्यावरुन वरुन कपाडीया यांनी जमीनीच्या दिशेने उडी मारली. यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवार (13 एप्रिल 2019) सायंकाळी 6.30 वाजणेच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, ही घटना घडल्यावर हरेंद्र कपाडीया यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषीत केले. मीड डे या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, एका अधिकाऱ्याने सांगितले की, गेले काही दिवस कपाडीया हे आजाराने त्रस्त होते. ब्रेन स्ट्रोक झाल्याने गेले 8 ते 10 महिने त्यांनी कामावर येणे बंद केले होते. त्यांच्यावर कोकिळाबेन रुग्णालयात मेंदूवरील शस्त्रक्रियासुद्धा झाली होती.
दरम्यान, गेले दोन ते तीन महिन्यांपासून कपाडीया हे पुन्हा एकदा कामावर रुजू झाले होते. मात्र, त्यांची स्मरणशक्ती कमालीची कमी झाल होती. कपाडीया यांनी आपल्या आजाराला कंटाळूनच आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. (हेही वाचा, लिंग बदल शस्त्रक्रिया करण्यास मुलाला वडीलांचा विरोध, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या)
दरम्यान, पोलिसांनी अपघाती नोंद अशी या मृत्यूची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे. पोलिसांनी तपास करताना कपाडीया यांच्या कार्यालयातील इतर सहकाऱ्यांचेही जबाब घेण्यास सुरुवात केली आहे.