देशभरात कोरोनाची परिस्थिती पाहता नागरिकांना लॉकडाउनचे आदेश पाळावे असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच नागरिकांना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरातच थांबण्याचे आवाहन केले जात आहे. तरीही काही नागरिक बेजाबदारपणे वागत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता अशा नागरिकांच्या विरोधात पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. तसेच पोलीस आणि डॉक्टरांवर हल्ले केल्यास त्याची शिक्षा होणार असल्याचा नवा कायदा सुद्धा सरकारने जाहीर केला आहे. तरीही आज मुंबईतील गोवंडी परिसरातील टाटा नगर येथे पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
टाटा नगर मध्ये पोलिसांच्या वाहनावर का दडफेक करण्यात आली याचे कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र पोलिसांच्या वाहनाचे नुकसान झाल्याने गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामध्ये एक अल्पवयीनसह अन्य दोन जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. यापूर्वी सुद्धा पोलिसांवर हल्ले करण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र सरकारने पोलीस आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांवर हल्ले केल्यास कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.(मुंबई: मीरारोड येथे मुस्लिम व्यक्तीकडून किराणा सामानाची डिलिव्हरी घेण्यास नकार देणाऱ्या 51 वर्षीय व्यक्तीस अटक)
#गोवंडीच्या टाटा नगर भागामध्ये आज दुपारी पोलीस वाहनावर दगडफेक करण्यात आली. त्यात वाहनाचे नुकसान झाले असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. एका अल्पवयीनासह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. @airnewsalerts @airnews_mumbai
— AIR News Mumbai, घरीच रहा, सुरक्षित रहा (@airnews_mumbai) April 23, 2020
दरम्यान, महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे येथे सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 5 हजारांच्या पार गेला आहे. तसेच 20 एप्रिल पासून कोरोनाच्या नॉन-हॉटस्पॉट ठिकाणी लॉकडाउनचे काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. मात्र रेड झोन मधील नियम थिशिल करण्यात येणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले आहे. देशात लॉकडाउनचे आदेश येत्या 3 मे पर्यंत कायम राहणार आहेत. मात्र त्यानंतर सरकार कोरोनाची एकूणच परिस्थिती पाहता काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.