
कोकणात (Kokan) दरवर्षी प्रमाणे यंदाही पावसाने दमदार हजेरी लावली असून, सततच्या मुसळधार पावसामुळे खेडमधील जगबुडी नदीने (Jagbudi River) धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Express Way) वाहतूक विस्कळीत झाली असून एकेरी वाहतूक मंद गतीने सुरु आहे. तसेच या पुलाजवळ सुरक्षारक्षक आणि पोलीसही तैनात करण्यात आले आहे.
पावसाने कोकणात धुमशान घातले असून, रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत केले आहे. मुसळधार पावसामुळे येथील ब-याच नद्या काठोकाठ वाहत असून नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यातील एक महत्त्वाची नदी म्हणजे जगबुडी नदी. या नदी परिसरात दमदार पाऊस झाल्याने या नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. ही नदी मुंबई-गोवा महामार्गावर येत असल्याने या पूलावरील एकेरी वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारीची उपाय म्हणून येथे पोलिस तैनात करण्यात आले आहे.
तसेच या नदीच्या आसपासच्या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जगबुडी नदीप्रमाणे चिपळूणमधील वाशिष्ठी नदीच्या पात्रातही वाढ झाली आहे. म्हणून या नदीचा पुल देखील वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
जगबुडी नदीचा पूलावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने मुंबई-गोवा महामार्गाने प्रवास करणा-या लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. तसेच त्यांनी पर्यायी मार्ग अवलंबवावे असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.