रत्नागिरी: जगबुडी नदीवरील पुलाचा जोडरस्ता खचला, नागरिकांनी रागाने अधिकाऱ्यांनाच पुलाला बांधलं (Watch Video)
Jagbudi River Bridge Damage Officers Tied To Bridge (Photo Credits: Twitter)

रत्नागिरी (Ratnagiri)  जिल्ह्यात खेड (Khed) तालुक्यातील जगबुडी नदी (Jagbudi River)  हा पावसाळ्यात दरवर्षी चर्चेचा विषय ठरतो. शनिवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर या नदीच्या पूलाशेजारी बांधण्यात आलेला नवा जोडरस्ता मोठ्या प्रमाणात खचला गेला. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व संताप पाहायला मिळत होता . ही परिस्थिती लक्षात घेऊन खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर, नगरसेवक व नागरिकांनी शनिवारी संध्याकाळी या मार्गावर ‘रास्तारोको’ केला. यावेळी कार्यकारी अभियंता बामणे आणि गायकवाड हे पुलाची पाहणी करण्यासाठी आले असता संतप्त नागरिकांनी त्यांनाच पुलाच्या कठड्याला बांधून ठेवले. पुलाची दुरुस्ती वेगाने करण्याचे आश्वासन दिल्यावरच त्यांना सोडण्यात आले होते. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल हात आहे

अधिकाऱ्यांना शिकवला धडा (Watch Video)

 

दरम्यान कधी पुरामुळे तर कधी अपघातांमुळे या नदीचे नाव सर्वांना ओळखीचे झाले आहे. याच जगबुडी नदीवर 10 एप्रिल 2015 पासून एका नव्या पुलाची बांधणी सुरू होती. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात जगबुडी नदीवरील जुन्या पुलाशेजारी हा बांधण्यात आला होता.Mumbai Dangerous Bridge: नव्याने झालेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये आढळले 15 धोकादायक पूल; जाणून घ्या यादी

जुना ब्रिटिशकालीन पूल खचल्यामुळे नागरिकांसाठी हा नवा पुल उभारला जात होता काही दिवसात काम पूर्ण होऊन याच वर्षी हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार होता. मात्र पुलाच्या लोकार्पणाआधीच पावसामुळे जोडरस्त्याला मोठे भगदाड पडले होते याशिवाय पुलाच्या संरक्षक भिंतीला देखील तडे देखील गेले आहेत. यामुळे नागरिकांचा संताप होणे अपेक्षितच होते, अशात अधिकारी याबाबतच्या तक्रारींकडे कानाडोळा करत होते म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी हा असा मार्ग निवडण्यात आला होता.