मुंबई गोवा महामार्गावर बस आणि कंटेनरची जोरदार धडक; 30 जण जखमी
Image used for Representational Purpose | (Photo Credits: ANI)

मुंबई गोवा महामार्गावर (Mumbai- Goa Highway) आज (6 ऑक्टोबर) रोजी सकाळी बस आणि कंटेनरच्या धडकेत 30 जण जखमी झाल्याचे समजत आहे. भरधाव कंटेनर आणि दोन बसेसची जोरदार धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला आहे. माणगाव (Mangaon) जवळ ढालघर (Dhalghar) फाटा इथे हा अपघात झाला. गुजरात: अंबाजी येथे दर्शन घेऊन येणाऱ्या भाविकांची बस दरीत कोसळली, 18 जणांचा मृत्यू; नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला खेद

झी 24 तास या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, या अपघातात 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. या बाबत माहिती मिळताच आजूबाजूच्या गावातील स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व जखमींना उपचारासाठी होसोयीतलं मध्ये हलवण्यास सुरुवात केली. तूर्तास यातील 7 जखमींवर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर उर्वरीत जखमींवर माणगाव उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे.

दरम्यान या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र कंटेनर आणि बसेसचे यात मोठे नुकसान झाले आहे.