विक्रोळी (Vikhroli) येथील पार्कसाईटच्या ठिकाणी भीषण अपघात झाला असल्याची घटना आहे. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
धान्याने भरलेला ट्रक जात असताना त्याचा मागील बाजूचे चाक गटारामध्ये अडकले. परंतु प्रयत्न करुनही चाक गटारात अडकून राहिल्याने ट्रक पलटला. त्यावेळी घटनास्थळी पाच जण उभे असताना ते त्याखाली चिरडले गेले. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला आणि एक जण गंभीर जखमी झाला.(हेही वाचा-Mumbai Local Horror: कुर्ला स्थानकावर मोबाईल चोराच्या हल्ल्यात धावत्या लोकल मधून पडून तरुणी जखमी; आरोपी ताब्यात)
या प्रकरणी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तर ट्रक चालकाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.