Accident (PC - File Photo)

Mumbai News: मरोळ फायर ब्रिगेड स्टेशनमध्ये कार्यरत असलेले 55 वर्षीय फायरमनाचा गुरुवारी रात्री रस्त्यावर वाहनांने  धडक दिल्याने अपघात झाला. अपघातामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. रात्रीच्या वेळी कामावर जात असताना त्यांचा अपघात झाला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सद्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचा मुलगा साहिल ठाकूर (21) हा त्याची दुचाकी चालवत होता, तर त्याचे वडील संदीप हे दोघे प्रवासी होते.

साहिल संदीपला रात्रीच्या शिफ्टच्या ड्युटीसाठी त्याच्या कामावर सोडत होता. रात्री 11:45 च्या सुमारास, जेव्हा ते घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवर पोहोचले, तेव्हा साहिलने, स्पीड बंपरमुळे त्याने त्याचे वाहन कमी केले. मात्र, मागून भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी कारने (एमएच 02 एक्यू 5744) साहिलच्या बाईकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की संदीप बाईक वरून उडाले आणि रस्त्याच्या कोपऱ्यावर पडला, तर साहिल त्याच्या दुचाकीसह घसरला.

चारचाकीचा चालक – परवीज शकील शेख (२२, रा. मरोळ, अंधेरी) असे असून साहिलने संदीपला उचलून घाटकोपर येथील दिशा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. अपघातात त्यांच्या डोक्याला, पाठीला, पायाला आणि हाताला दुखापत झाली. पीडितेची पत्नी शिवानी यांनी शेख याला भरपाई भरण्यास सांगितला, पंरतु त्याने नकार दिला.

 शेख याला घाटकोपर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम २७९ (रॅश ड्रायव्हिंग), ३३७ आणि मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ (धोकादायकपणे वाहन चालवणे) या कलमांखाली अटक केली होती.