Girgaon Fire: मुंबईच्या गिरगाव (Girgaon) परिसरात आग लागल्याचं वृत्त आहे. 5 वी कुंभारवाडा लेन, मारूती मंदीर रोड येथील मोची बिल्डिंगला (Mochi building) आग लागली आहे. या आगीमध्ये जीवीतहानीचं वृत्त नाही. आगीचं नेमकं कारण समजू शकलं नसलं तरीही फायर ब्रिगेड आणि पोलिस तात्काळ मोची बिल्डिंग परिसरात पोहचले आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान प्रयत्न करत आहे.
#Mumbai: Fire breaks out at Mochi building, at 5th Kumbharwada, Maruti Mandir road, Girgaon; Fire brigade and police rushed to the spot, no injuries reported pic.twitter.com/OOW5TCHviX
— ANI (@ANI) January 30, 2019
गिरगाव परिसरात सध्या मेट्रोचं काम सुरु असल्याने वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात अडथळा येत आहे. येत्या काही दिवसातच मुंबईची ओळख असलेली क्रांतिनगर चाळ मेट्रोच्या कामाखाली जमीनदोस्त करण्यात येणार आहे. तसेच गिरगावमध्ये काही जुन्या इमारती आणि चाळी या राहण्यास अनुकूल नसल्याने रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये आहेत.