Mumbai Fire Brigade Recruitment 2023: बीएमसी करणार फायरमॅन पदावर होणार नोकरभरती; portal.mcgm.gov.in  वर पहा अर्जप्रक्रिया
File image of BMC headquarters | (Photo Credits: Facebook)

मुंबईत फायर ब्रिगेड (Mumbai Fire Brigade) मध्ये 'फायरमॅन' (Fireman) पदासाठी नोकरभरती जाहीर करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही नोकरभरती वॉक ईन पद्धतीने म्हणजेच थेट सरळसेवा भरती असणार आहे. यासाठी कोणत्याही कोणत्याही परीक्षेला उमेदवारांना सामोरं जाण्याची गरज असणार नाहील दरम्यान ज्यांना अर्ज करायचा आहे ते उमेदवार portal.mcgm.gov.in या मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात. तेथे पदाबाबत आणि नोकरभरती प्रक्रियेबाबत अधिक माहिती मिळणार आहे. नक्की वाचा: Job Opportunity: आता ७वी पास विद्यार्थ्यांना मिळणार सरकारी नोकरी, विविध पदांसाठी होणार पदभरती.

फायरमॅन पदावर 910 जागांसाठी ही नोकरभरती जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान उमेदवार हा किमान 10वी पास असावा आणि 15 वर्ष सेनेत काम करण्याचा अनुभव असावा किंवा 12 पास किमान 50% गुणांसह उत्तीर्ण असावा. वयोमर्यादा ही 31 डिसेंबर 22 पर्यंत 25 पेक्षा जास्त असू नये. जड वाहनं चालवण्याचा वैध परवाना असावा.यासाठी सशुल्क अर्ज करावा लागणार आहे. खुला व अराखीव वर्गासाठी 944 रूपये, मागासवर्गीयांसाठी 500 रूपयांचा डिमांड ड्राफ्ट काढावा लागणार आहे.

पहा ट्वीट

2004 मध्ये मोठ्या प्रमाणावर अग्निशमन विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भरती झाली होती. त्यानंतर या विभागात भरती झाली नाही. बॅकलॉग भरण्यासाठी अग्निशमन विभागात 2012 मध्ये शेवटचे 24 जवान नियुक्त करण्यात आले. मात्र नंतर कोणतीही नियुक्ती झाली नाही. मध्यंतरी काही कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्यात आली. त्यामुळे आता या नोकरभरतीकडे लक्ष लागलेले असेल.