Job Opportunity: आता ७वी पास विद्यार्थ्यांना मिळणार सरकारी नोकरी, विविध पदांसाठी होणार पदभरती
आता वर्ग ७ वी पास ते पद्युत्तर उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड देहू रोड पुणे येथे विविध पदांसाठी पदभरती केल्या जाणार आहे.
सरकारी नोकरी मिळवायची असेल तर उच्च शिक्षण, स्पर्धा परिक्षा अशा विविध बाबी परिपूर्ण केल्यास सरकारी नोकरीची संधी मिळू शकते. पण आता वर्ग ७ वी पास ते पद्युत्तर उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड देहू रोड पुणे येथे विविध पदांसाठी पदभरती केल्या जाणार आहे. तरी यांत वर्ग सातवी पास ते पद्युत्तर शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना पदभरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरीची संधी देण्यात येणार आहे. वेगलवेगळ्या पदांसाठी वेगवेगळा निकष कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून जारी करण्यात आला आहे. तरी या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास तुम्हाला तो ऑनलाईन माध्यमातून करता येणार नाही. पण ऑफलाईन पध्दतीने उमेदवार कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालय, देहूरोड, देहू रोड रेल्वे स्टेशनजवळ, देहूरोड पुणे – 412101 (महाराष्ट्र) या पत्यावर ३१ जानेवारी २०२३ च्या आधी आपला अर्ज पाठवू शकतात.
कॅन्टोन्मेंट बोर्ड देहू रोड पुणे येथे निवासी वैद्यकीय अधिकारी, हिंदी अनुवादक, कर्मचारी परिचारिका, क्ष-किरण तंत्रज्ञ, फार्मसी अधिकारी, सर्वेक्षक कम ड्राफ्ट्समन, उपनिरीक्षक, कनिष्ठ लिपिक कम कंपाउंडर, पेंटर, सुतार, प्लंबर, मेसन, ड्रेसर, माळी, वॉर्ड अय्या, वॉर्ड बॉय, वॉचमन स्वच्छता निरीक्षक, सफाई कर्मचारी या पदांसाठी पदभरती करण्यात येणार आहे. (हे ही वाचा:- Government Job: आता सरकारी नोकरी मिळवण्यासाठी एमपीएससी पास करण्याची गरज नाही, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची मोठी घोषणा)
यांत वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता दिल्या गेली आहे. तरी तुमची शिक्षणीक पात्रता आणि हवं असलेल्या पदासाठी अचूक र्ज करावा. या पदभरती विषयी अधिक सविस्तर माहिती हवी असल्यास http://www.cbdehuroad.org/ कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकृत साईटला भेट दिल्यास या पदभरती विषय अधिक माहिती मिळवता येईल.
(The above story first appeared on LatestLY on Dec 26, 2022 12:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

