मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांच्यासह अन्य 32 जणांच्या विरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांच्या तक्रारीनुसार अकोलामधील शहर कोतवाली पोलिसात हा गुन्हा दाखल केला आहे. FIR मध्ये परबमीर सिंह आणि मुंबई EOW चे डीसीपी पराग मनेरे यांच्यासह अन्य काही जणांवर आरोप लावण्यात आले आहेत. मुख्य बाब म्हणजे सर्वांच्या विरोधात कमल 27 नुसार गुन्हा दाखल केला आहे. तक्रारकर्ते पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी असा आरोप लावला आहे की, ठाणे पोलीस आयुक्त असताना परमबीर सिंह यांनी आरोपींचा बचाव करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला होता. ही गोष्ट मान्य न केल्यास त्यांचा छळ आणि खोटा गुन्हा सुद्धा तयार करण्यात आला होता.
गेल्या महिन्यात सिंह यांना पोलीस आयुक्त पदावरुन हटवल्यानंतर त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार केल्याची ही दुसरी तक्रार आहे. यापूर्वी माजी पोलीस अधिकारी अनूप डांगे यांनी परमबीर सिंह यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा आरोप लावत तक्रार केली होती. घाडगे यांनी 20 एप्रिलला पोलिसांच्या महानिर्देशकांना पत्र लिहित ही तक्रार केली होती. निरीक्षकांनी ही तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सोपवली होती.(Maharashtra Phone Tapping Case: फोन टॅपींग प्रकरणी IPS Officer Rashmi Shukla यांची आज चौकशी; कोरोना स्थितीचे कारण देत अनुपस्थित राहण्याची शक्यता)
Tweet:
Maharashtra Police has filed FIR against former Mumbai police commissioner Param Bir Singh following corruption allegations by a police inspector, a senior official says
— Press Trust of India (@PTI_News) April 29, 2021
दरम्यान,अँन्टेलिया प्रकरणानंतर परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात वसूलीचा आरोप लावला होता. त्यानंतर सीबीआयने प्राथमिक तपास करुन FIR दाखल केला आहे. याच दरम्यान राज्य सरकारने राज्याचे डीजीपी परमबीर सिंह यांच्या विरोधात आणखी एका प्रकरणी तपास करण्याचे आदेश दिले आहेत.