धारावी झोपडपट्टीचा लवकरच होणार पुनर्विकास, धारावीकरांना मोठा दिलासा मिळणार 
धारावी झोपडपट्टी (फोटो सौजन्य- फेसबुक)

Mumbai: गेल्या अनेक वर्षापासून धारावी पुनर्विकासाचा मुद्दा रखडून राहिला होता.तसेच पुनर्विकासाबाबत आश्वासन देऊन ही कामे सुरु करण्यात आली नाही. मात्र आता लवकरच धारावीचा पुनर्विकास होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. त्यामुळे धारावीकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

धारावी येथील झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासासाठी दाखल झालेल्या निविदांची पाहणी करण्यात आली आहे. त्यामुळे पुनर्विकासाचे काम दुबई येथील सेकलिंक कंपनीकडे सोपण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच राज्य सरकारकडून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. (हेही वाचा- न्यायालयाचा पुणे पोलिसांना दणका, आनंद तेलतुंबडे याची अटक बेकायदेशीर असल्याचं सांगत त्यांना सोडण्याचे आदेश)

2009 पासून तीन निविदा काढण्यात आल्या होत्या. तेव्हा प्रथम दाखल काढण्यात आलेली निविदा तांत्रिक कारणामुळे रद्द झाली. त्यानंतरच्या निविदांना प्रतिसाद न मिळाल्याने पाच वेळा मुदतवाढ देण्यासाठी अडथळे निर्माण होऊ लागले. अखेर राज्य सरकारकडून पुनर्विकासाठी हिरवा कंदिल दाखवण्यात आला आहे,