Representational picture. Credits: Pixabay

 

Mumbai Tanishq Store:  सांताक्रूझ पोलिसांनी भारतातील प्रसिद्ध तनिष्क ज्वेलरी स्टोअर्समधील फसवणुकीच्या मुख्य सूत्रधाराला पकडण्यात यश मिळवले आहे. आरोपीने फसवणूक करण्यासाठी बनावट सोन्याची नाणी बनवली आणि, परिणामी 54 लाख रुपयांचे नुकसान झाले. विनित सोनी (44) असे आरोपीचे नाव असून तो पूर्वी गुजरातमधील तनिष्क ज्वेलरी स्टोअरमध्ये नोकरीला होता. तेथे संपुर्ण कामाचे स्वरुप समजून घेतल्यानंतर त्याने हा कट रचला. एकसारखे पॅकेजिंग, लोगो आणि डिझाईन्स वापरून विनित सोनीने सोन्याचा मुलामा असलेल्या चांदीच्या नाण्यांची खऱ्या नाण्यांसोबत अदलाबदल केली. यापूर्वी सांताक्रूझ पोलिसांनी या प्रकरणी सोनीच्या पुतण्याला अटक केली होती.

आरोपी विनीत सोनीने असा रचला कट 

काका-पुतण्याच्या जोडीने मुंबईतील सात तनिष्क ज्वेलरी स्टोअर्सना लक्ष्य केले, ज्यात सांताक्रूझ पश्चिम, अंधेरी पश्चिम, इनऑर्बिट मालाड पश्चिम, गोरेगाव पश्चिम, माटुंगा पूर्व आणि बोरिवली पश्चिमेचा समावेश आहे. सुरत आणि अहमदाबाद येथील तनिष्क स्टोअरमध्येही त्यांनी फसवणूक केली.  त्याच्याकडून चोरीचे दागिने पोलिसांना अद्याप मिळालेले नाहीत अशी माहीती समोर आली आहे.

विनित सोनी आणि त्यांचा पुतण्या पृथ्वी सोनी (20) यांनी सांताक्रूझ पश्चिम येथील लिंकिंग रोडवर असलेल्या तनिष्क ज्वेलरी स्टोअरला भेट दिली तेव्हा डिसेंबर 2021 ते जानेवारी 2022 दरम्यान या घटना घडल्या. त्यांनी प्रत्येकी 10 ग्रॅम वजनाची तीन सोन्याची नाणी सादर केली, ज्यात तनिष्क दागिन्यांची चिन्हे आणि हॉलमार्क होते.  त्या बदल्यात नाणी जमा करताना आरोपींनी दुकानातून सोन्याचे दागिने घेतले. मात्र, आठवडाभरानंतर नाणी वितळण्याच्या प्रक्रियेदरम्यान ती बनावट असल्याचे उघड झाले. स्टोअरने ताबडतोब सांताक्रूझ पोलिसांना सतर्क केले आणि (FIR) एफआयआर  दाखल केला.